महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Wednesday 1 July 2020

लर्निंग फ्रॉम होम महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक समजून घेवूया.

कोव्हीड १९ या विषाणुजण्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया  सुरू राहण्यासाठी लर्निंग  फ्रॉम होम ही संकल्पना राबवविणे बाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक:२०२०/प्र.क्र.८४/एस.डी.-६ मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : २८ एप्रिल, २०२०

प्रस्तावना:

सध्या देशभरामध्ये संचारबंदीची परिस्थिती आहे. जगभरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अशा गंभीर परिस्थीतीत वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्यामुळे, कारखाने बंद असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणाप्रती अधिक सजग करता येऊ शकते. संचारबंदीच्या काळामध्ये पालक, मुले, सर्व कुटुंबीय घरातच बंदिस्त झाले आहेत. अशा काळात घर हेच एक प्रयोगशाळा बनवता येऊ शकेल का? घरातील वेगवेगळे साहित्य, स्वयंपाक घरातील वस्तू, त्यांची रचना व कार्य तसेच या वस्तूंच्यामागचे विज्ञान याबाबत मुलांमध्ये आपल्याला जागृकता निर्माण करता येऊ शकते.


कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. शालेय स्तरावरील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील कालावधीकरीता वाढविण्यात आली आहे. संचारबंदीच्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या प्रवाहात असणे महत्त्ाचे आहे. या मुलांना अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत ठेवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. संचारबंदीच्या या काळात मुलांच्या मनामध्ये असलेली भिती, चिंता दूर करण्याचा प्रयत्नही करणे आवश्यक आहे. हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करून काही नव्या गोष्टी करता येऊ शकतात. यासाठी तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आता उपयुक्त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना आता स्वयंअध्ययन करता येईल. सद्य:स्थितीत शालेय अभ्यासक्रमातील मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरीकशास्त्र, भूगोल, कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासाची आता नवीन दिशा ठरविता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकेल.मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी सध्या खूप वाव आहे. पालकांना मुलांचा कल, छंद, वृत्ती, दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला काही मदत करता येऊ शकेल का? त्यासाठी प्रश्नावली त्यांना पुरवता येऊ शकेल का? याचाही विचार करता येऊ शकतो. सध्या शालेय अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापनाचे कार्य बंद असले तरी मुलांचे अध्ययन मात्र बंद नाही. ते सतत चालू असते. पण अभ्यासापलीकडच्या या अध्ययनाला शालेय अभ्यासाची जोड देता आली तर शिक्षण हे अधिक समृद्ध, सखोल आणि समजपूर्वक करता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकेल का?


कोरोना (COVID-१९) या विषाणूच्या प्रसारामागील विज्ञान समजावून घेतलं तर असं लक्षात येतं की, हा विषाणू माणसांच्या सभा संपर्कामुळे (Community transfer) मोठ्या प्रमाणात प्रसारित होतो. त्यामुळे सध्या जगभरामध्ये अनिवार्य कामासाठी भेटणाऱ्या व्यक्ती एकमेकापासून अंतर ठेवून काम करत आहेत. एकमेकांना अभिवादन करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत.


मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीतील अभिवादनाची पद्धती जगभरामध्ये वापरली जात आहे. या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीला जगामध्ये एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीचा वारसा मुलांना समजावून सांगून त्याचे महत्त्व पटवून देण्याची ही योग्य वेळ आहे.


शासन परिपत्रक:

             महाराष्ट्र शासनाने या पूर्वीपासूनच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. त्या सर्व पालकांपर्यंत आणि मुलापर्यंत पोहोचून आपले शिक्षण आपण या काळात सुद्धा चालू ठेवू शकतो. त्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक एप्लिकेशन्स यांचा वापर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सेक्युरिटी संदर्भातही विद्यार्थी आणि पालक यांचे सतत उद्बोधन होणे आवश्यक आहे.सद्य:स्थितीमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी काही महत्त्वाच्या संसाधनांची माहिती शासन सर्वाना करून देत आहे. त्यांचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता आहे.या करिता घरी राहुन शिक्षण ( Learning From Home) ही संकल्पना राबविण्यासाठी खालील संसाधनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून लनींग फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी.

9.DIKSHA: प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे म्हणून केंद्र शासन (MHRD) आणि महाराष्ट्र शासनाने DIKSHA ई-लर्निग प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.


DIKSHA वर सद्य:स्थितीमध्ये इयत्ता १ ली ते १०वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील ९००० पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. या वर उपलब्ध ई-साहित्यामध्ये प्रामुख्याने इंटरॅक्टिव व्हिडिओ, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ, उपक्रमावर आधारित व्हिडिओ, बौद्धिक खेळस्वरुपातील गेम्स, विविध वर्कशिट, इंटरॅक्टिव प्रश्नपेढी इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील DISKHA वरील ई-साहित्याची निर्मिती केली आहे. DIKSHA वरील उपलब्ध ई साहित्याचा वापर करून विद्यार्थी घरबसल्या आपले अध्ययन सुरू ठेवू शकतात तसेच पालक याचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकतात.


अ. इयत्ता १ली ते १०वी साठीचे DIKSHA मोबाईल अॅप : इयत्ता १ली ते १०वी च्या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये Q.R.Code देण्यात आले आहेत. या Q.R.Code ला शिक्षकांमार्फत तयार करण्यात आलेले ई-लर्निंग साहित्य जोडलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही स्वयं अध्ययनावर आधारित उपक्रमांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. हे सर्व साहित्य पाठयपुस्तकातील QR कोड DIKSHA अॅप वापरून स्कॅन केल्यावर सहज पाहता येणार आहे. तसेच पाठ्यपुस्तक नसल्यास सर्व साहित्य DIKSHA अॅप मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून देखील पाहता येणार आहे. हे साहित्य ऑफलाईन वापरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. DIKSHA अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

आ. इयत्ता १ ली ते १०वी साठीचे DIKSHA वेब पोर्टल : संगणक व लॅपटॉप वर देखील DIKSHA मधील ई-साहित्य पाहण्यासाठी DIKSHA वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यात इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विषयांचे ई-साहित्य पाहता येते. DIKSHA वेब पोर्टल वर ई-साहित्य पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

www.diksha.gov.in/explore

इ. क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्न : इयत्ता आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, गणित आणि विज्ञान साक्षरतेवरील cCT आठवड्यातून DIKSHA वर अपलोड केल्या जातात. CCT सरावासाठी नवीन प्रश्न दर सोमवारी अपलोड केले जातात आणि गुरुवारी उत्तरे दिली जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार कौशल्य निर्माण करण्याची चांगली संधी उपलब्ध होते. हे प्रश्न बघण्यासाठी खालील URL चा वापर करावा. CCT मार्फत सदर उपक्रम इतर इयतांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

https://diksha.gov.in/resources/play/collection/do 31290608850520473612338?contentTy pe=TextBook

२. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती : पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती मार्फत इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यास अनुसरून खालीलप्रमाणे अध्ययन साहित्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अ. ऑनलाईन पाठ्यपुस्तके: इ.१ ली ते १२ वी साठीची सर्व पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी बालभारती वेबसाईट - www.ebalbharati.in   या संकेतस्थळावर जाऊन PDF BOOKS DOWNLOADING मधून इयत्ता १ ली ते १० वीची राज्य अभ्यासक्रमावरील एकूण दहा भाषा माध्यामातील पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात डाऊनलोड करावी. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी ची मराठी आणि इंग्रजी या भाषा माध्यमातील PDF स्वरूपातील पाठ्यपुस्तके डाऊनलोड करावी. पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

www.ebalbharati.in

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook12.aspx

आ. ई-बालभारती : पाठ्यपुस्तक मंडळाने ई- बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातील सर्व विषयांचे ई - लर्निंग साहित्य तयार करण्यात आलेले आहे. या साहित्यामध्ये प्रत्येक पाठाचे व्हिडीओ अॅनिमेशनसह देण्यात आले आहेत. पाठावर आधारीत स्वाध्याय, प्रश्नपेढी व काही कृती देण्यात आल्या आहेत. हे साहित्य ई-बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सदर साहित्य डाऊनलोड करून ऑफलाईन स्वरूपात वापरता येते. यासाठी पुढील लिंकचा वापरावी. 

https://learn.ebalbharati.in/

 https://play.google.com/store/apps/details?id=com.EBalBharati.Student


इ.बोलकी बालभारती (Talking Books) : ई- बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १० वी च्या दिव्यांग (दृष्टी संदर्भात ) तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची सर्व भाषा विषयांची Talking Books तयार करण्यात आली आहेत. ती ऑडीओ स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे श्रवण करता येईल. त्यासाठी पुढील लिंक वापरावी.

https://learn.ebalbharati.in/

ई. इयत्ता ८ वी ते १० वी विज्ञान, भूगोल, संस्कृत विषयाचे व्हिडीओ स्वरूपातील साहित्य :

बालभारतीने पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या मदतीने संयुक्तरीत्या इयत्ता ८ वी ते १० वी विज्ञान , भूगोल , संस्कृत विषयाचे व्हिडीओ स्वरूपातील साहित्य तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार विषयनिहाय पाठांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ, प्रात्यक्षिक कार्याचे व्हिडीओ अशा स्वरुपाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी खालील लिंक वापराव्यात.


https://www.youtube.com/user/ERCJPP

http://www.diksha.jnanaprabodhini.org/

https://learn.ebalbharati.in/

https://www.youtube.com/channel/UYCacnAJUq6dkmYrvb401cRA


उ. बालभारती YouTube वाहिनी : पाठ्यपुस्तक मंडळाने युट्यूब वाहिनी सुरू केलेली आहे. यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी चे विज्ञान, भूगोल आणि संस्कृत विषयांचे पाठनिहाय संकल्पना, घटक, उपघटक व प्रात्यक्षिक कार्य संदर्भातील व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

याशिवाय इयत्ता ११ च्या अभ्यासक्रमाचे संदर्भात विद्यार्थी, शिक्षक यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कशी अवलंबवावी याबाबतची माहिती देणारे अभ्यासमंडळ तज्ज्ञांचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.


https://www.youtube.com/channel/UYCacnAJUqbdkmYrvb401cRA

ए. पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती अॅप : Google play Store मधून ebalbharati App डाऊनलोड करावे. यावर आपले खाते उघडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर ई बालभारती अॅपवर ऑडिओ-व्हिडिओ इंटॅरॅक्टिव्ह स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे. सदर साहित्य एकदाच डाऊनलोड करून ते पुन्हा पुन्हा ऑफलाईन वापरण्याची सोय आहे.

https://play.google.com/store.apps.details?id=com. EBalBharati 

ऐ. किशोर मासिक : पाठ्यपुस्तक मंडळामार्फत किशोर मासिक तयार करण्यात येते. १९७१ पासून ते चालू महिन्यापर्यंतचे असे ४९ वर्षातील सर्व अंक आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना बालभारतीच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यासाठी
 http://kishor.ebalbharati.in/Archive/       लिंकचा वापर करावा.

३. अवांतर वाचनासाठीची वेबसाईट व अॅप्लीकेशन

अ. National Digital Library of India: विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषांमधील ८०००० पुस्तके ई - बुक स्वरूपात या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

 https://ndl.iitkgp.ac.in

आ. Bolo: वाचनासाठी चे मोबाईल अॅप्लीकेशन :Google द्वारा निर्मित Bolo हे अॅप्लीकेशन मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. त्या संदर्भातील लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.seekh


8.NROER: इ.१ ली ते १२ वी साठीच्या सर्व विषयांसाठी ई-साहित्य संग्रह : राष्ट्रीय पातळीवर इ.१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले सर्व ओपन सोर्स इ-साहित्य नॅशनल रीपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशनल रीसोर्सेस येथे उपलब्ध आहेत. NROER मध्ये विविध भाषेतील ई साहित्य उपलब्ध आहे. यासाठी खालील URL चा वापर करावा.

http://nroer.gov.in/welcome
५. e -Pathshala : NCERT ने इयत्ता १ ली ते १० वी साठी विविध प्रकारचे ई साहित्य वर विविध भाषेत अपलोड केली आहेत. यासाठी खालील URL चा वापर करावा.

http://epathshala.co.in

http://epathshala.gov.in

६. SWAYAM: हा राष्ट्रीय ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित (इयत्ता नववी-बारावी) आणि उच्च शिक्षण (पदवीधर आणि पदव्युत्तर कार्यक्रमांतर्गत) चे १९०० ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यात आले आहेत. यासाठी खालील URL वापरावे.

https://swayam.gov.in

७. SWAYAM PRABHA: यामध्ये शैक्षणिक सामग्री २४/७ प्रसारित करणारे ३२ डीटीएच टीव्ही चॅनेल आहेत. डीडी, फ्री डिश सेट टॉप बॉक्स आणि एन्टीना वापरून हे चॅनेल देशभरात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. चॅनेलचे वेळापत्रक आणि इतर तपशील पोर्टलवर उपलब्ध आहेत. या चॅनेलमध्ये शालेय शिक्षण (इयत्ता नववी-बारावी) आणि उच्च शिक्षण (पदवीधर आणि पदव्युत्तर कार्यक्रमांतर्गत) या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. यासाठी खालील URL वापरावे. तसेच या अंतर्गत NCERT चे किशोर मंच २४x७ टीव्ही चॅनेल साठी चॅनेल ३१ वर भेट देता येईल.

https://swayamprabha.gov.in

८.PODCAST: CBSE ने एक पॉडकास्ट अॅप सीबीएसई-शिक्षा वाणी लॉन्च केले असून हे अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पॉडकास्टद्वारे महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित करण्यासाठी, याचा उपयोग होतो.

स्टोरी टेलिंग पासून ते विविध शैक्षणिक व कौशल्याधारित विषयांपर्यत तज्ञांद्वारे विविध विषयांवर ऑडिओ फाइल तयार करणे यामुळे शक्य झाले आहे.


९. National Digital Library of India: नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षक, विद्यार्थी, व्याख्याते, विद्यार्थी आणि शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी व्यासपीठ आहे. यासाठी


 https://ndl.iitkgp.ac.in  हे URL वापरा

१०. विज्ञान विषयासाठी सिम्युलेशन मोबाईल अॅप्लीकेशन - PhET विज्ञान विषयातील विविध प्रयोग आभासी प्रयोगशाळेच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचे अॅप खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=edu.colorado.phet.android_app

११. Google Classroom: शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रकल्प, गृहपाठ, अभ्यास, ई-साहित्य पुरवण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशन -Google Classroom. यानुसार अध्ययन साहित्याची देवाण घेवाण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त आहे.


https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.classroom

१२. Google Hangouts: विद्यार्थ्यांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल ने संवाद साधण्यासाठी/अध्ययन - अध्यापनासाठी मोबाईल अॅप्लीकेशन Google Hangouts. Google चे हे अॅप्लीकेशन शिक्षक - विद्यार्थी - पालक यांच्यात ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात संवाद साधण्याचे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. याकरिता पुढील लिंक वापरता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings 

१३. ई-साहित्य उपलब्ध असलेला आंतरराष्ट्रीय संग्रह - Global Digital Library : आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांत बनवल्या गेलेल्या ओपन रिसोर्स व ई-साहित्याचा प्लॅटफॉर्म मोबाईल ऍप्लिकेशन स्वरूपात खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=io.digitallibrary.reader

Tuesday 26 May 2020

शास्त्रीय उपकरणे व त्यांचे उपयोग

🔲🔲🔲🌈Ⓜ🅰🅿🌈🔲🔲🔲 
     
🧭 *शास्त्रीय उपकरणे व त्यांचे उपयोग*🧭
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️
*(१) स्टेथेस्कोप*

*--- हृदयाची स्पंदने मोजणे.*
------------------------------------------
*(२) थर्मामीटर*

*--- शरीराचे तापमान मोजणे.*
-------------------------------------------
*(३) सीस्मोग्राफ*

*--- भूकंपाची तीव्रता मोजणे.*
---------------------------------------------------
*(४) रडार*

*- आकाशातील वस्तूची दिशा, स्थान दर्शविणे.*
---------------------------------------------------
*(५) फॅदोमीटर*

*--- समुद्राची खोली मोजणे.*
---------------------------------------------------
*(६) अॅनीमोमीटर*

*--- वा-याचा वेग मोजणे.*
---------------------------------------------------
*(७) मायक्रोमीटर*

*--- सूक्ष्म अंतर मोजणे.*
---------------------------------------------------
*(८) मायक्रोस्कोप*

*--- सूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे.*
---------------------------------------------------
*(९) रेनगेज*

*--- पर्जन्य मापन करणे.*
---------------------------------------------------
*(१०) लॅक्टोमीटर*

*--- दुधाची शुध्दता मोजणे.*
---------------------------------------------------
*(११) फोटोमीटर*

*--- प्रकाशाची तीव्रता मोजणे.*
---------------------------------------------------
*(१२) मॅनोमीटर*

*--- वायूचा दाब मोजणे.*
---------------------------------------------------
*(१३) केसोग्राफ*

*--- वनस्पतीची वाढ मोजणे.*
---------------------------------------------------
*(१४) हॅचरर*

*--- अंडी उबवणे.*
--------------------------------------------------
*(१५) ओडोमीटर*

*--- वाहनाचा वेग मोजणे.*
--------------------------------------------------
*(१६) अल्टीमीटर*

*--- समुद्र सपाटीपासूनची उंची मोजणे.*
---------------------------------------------------
*(१७) कॅलरीमीटर*

*--- उष्मांक मोजणे.*
==========================
संकलक :- *शंकर सिताराम चौरे* ( प्रा शिक्षक )
=========================
              ही पोस्ट माझ्या या ब्लॉगला देखील उपलब्ध आहे. अशा प्रकारच्या विविध माहिती /उपक्रमांच्या माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या.

Monday 25 May 2020

प्रकल्प यादी

प्रकल्प यादी
*पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी*
*(ही यादी फक्त नमून्यादाखल आहे. यात तुम्ही भर घालू शकता.)*

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -

*भाषा -:*
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.

*गणित -:*
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.

*सामान्य विज्ञान -:*
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.

*इतिहास व ना.शास्त्र  -:*
*  दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

*भूगोल -:*
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
1.  शैक्षणिक प्रकल्प,प्रकल्पासाठी लागणाऱ्या बाबी
     व  कसा तयार करून घ्यावा.
       शालेय  प्रकल्प म्हणजे काय ?-
          विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा
         एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले
         वय,आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज
         उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला 
         उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.

  अ. प्रकल्पाची उद्दिष्टे-
 स्वयंअध्ययनाची सवय लागणे.
 स्व-कुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
 स्वतःमध्ये उपजतच असणाऱ्या निरिक्षण,निवेदन,संकलन, सादरीकरण आदी क्षमताचा विकास      घडवणे.
 तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
कल्पकता,सृजनशीलता,संग्रहवृत्ती,श्रमप्रतिष्ठा,स्वयंशिस्त,चिकाटी,सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा   नीटनीटकेपणा,संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडविणे.
 आत्मविश्वास प्राप्त करणे.
 या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्टे अभ्यासणे. उदा. भाषा विषय-उच्चतमशुद्धता,
 पाठांतर क्षमता,विचार मांडण्याची क्षमता इत्यादी
 ब. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे -
  प्रकल्प कार्य करणे जितके महत्वाचे आहे,तितकेच केलेल्या प्रकल्प कार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्वाचे आहे, कारण निवेदन,सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे हि प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्प कार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्प कार्य लेखन कसे करावे, याचे मुद्धेसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे-
 विद्यार्थ्यांसाठी-
   1. प्रकल्पाचे नाव विषयासह-निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयाची निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
   2. प्रकल्पाचा प्रकार- निवड केलेला प्रकल्प पुढील पैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा-  सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प,तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
   3. प्रकल्पाची  सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
   4. प्रकल्पाचे साहित्य- विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखन साहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करावा.
   5. प्रकल्पाची कार्यपद्धती- प्रकल्प सकारात असताना कर्नुअत येणाऱ्या कृतीचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
   6. प्रकल्पाचे निवेदन-  यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
   7. प्रकल्पाचे सादरीकरण- संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदत्कार्याचाही उल्लेख करा.घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
   8. आकृत्या व चित्रांकणासाठी- येथे प्रकल्पाशीसंबंधित चित्रे आकृत्या नकाशे चिटकवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
   9. प्रकल्पपूर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद-यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
   10. मूल्यमापन- यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते  ज्ञान प्राप्त झाले?
    11. प्रकल्पाबाबत स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पूर्ण करताना मिळालेल्या  स्व-आनंदाचा  उल्लेख एक दोन वाक्यात करा.

क. शालेय प्रकल्पासाठी यादी-
     1. माहीती संकलन - थोर संत, थोर समाजसुधारक,थोर राष्ट्रपुरुष,थोर शास्त्रज्ञ,थोर खेळाडू,थोर समाजसेवक,थोर समाजसेविका इत्यादी.
   2. संग्रह : म्हणी संग्रह, वाक्यप्रचार संग्रह, अभंगसंग्रह,  श्लोकसंग्रह,   
सुविचारसंग्रह,  कवितासंग्रह, भावगीतसंग्रह,  पोवाडासंग्रह,   समरगीतसंग्रह,  देशभक्तीपरसंग्रह,  गीते पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह इत्यादी
   3. प्रदर्शन : चित्रकलाकृती प्रदर्शन,ग्रंथप्रदर्शनपुस्तकेप्रदर्शन विज्ञान प्रकल्प प्रदर्शन विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
   4. तक्ते : शालेय शैषणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी
   5. आदर्श : आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका आदर्श महिला आदर्श गाव आदर्श शहर आदर्श राष्ट्र इत्यादी

कार्यानुभव व्हिडीओ

*░▒▓█►★彡MAP彡★◄█▓▒░*
                    ❱❱🌀❰❰
      ══════●●●══════
         *〇वैविध्यपूर्ण कलाकुसर〇*   
    ══════●●●══════

*मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत घरबसल्या सुंदर नवनिर्मिती करायची इच्छा असेल तर खालील व्हिडिओ आपणांस उपयुक्त ठरतील...*
शिक्षक असाल तर विद्यार्थ्यांच्या वाॅट्सअॅप ग्रुपमध्ये नक्की पाठवा..
https://youtu.be/qEo8vTZI0m0
*टिश्यू पेपरची फुले*

https://youtu.be/4Y_IMHSQ4Ic
*टाकाऊ टुथब्रशपासून आकर्षक कलाकृती*

https://youtu.be/NJoYaAi_9Ik
*शंकू आकाराच्या घडीपासून कलाकुसर*

https://youtu.be/o98YDfykcM
*झटपट बनवा कागदी गुलाब*

https://youtu.be/wnuovHHSg00
*कागदी मासा एक प्रकार अनेक*

https://youtu.be/5kh9ESTK4jM
*फुलं आणि फुलदाणी*

https://youtu.be/wudGYhwqrMg
*भेटकार्ड चे विविध प्रकार*

https://youtu.be/LaXGErSkzEE
*3D फुलं आणि कलाकुसर*

https://youtu.be/MXVKNkqCaUs
*सुतळीपासून कलाकृती*

https://youtu.be/iw4FT8OmQZ0
*आकाशकंदील प्रकार अनेक*

https://youtu.be/ZKx7R9XsaPI
*प्लास्टीक बाॅटल झाकणांपासून कलाकृती*

https://youtu.be/i9P7hlY8jeg
*विविध प्रकारचे झुंबर*

https://youtu.be/7r37ix3Bz4I
*घर सजावटीसाठी जोडबाहुल्या*

https://youtu.be/Y2GdANRPRh8
*मार्कर लेखन*

https://youtu.be/m9Znvr8AGII
*वारली चित्रकला*

https://youtu.be/7779taig-5M
*क्विलिंग पेपरचे दागिने*

https://youtu.be/wp7JKYOFJwU
*जपानी पंख्याच्या घडीपासून कलाकुसर*

https://youtu.be/MWTo5L3XF8I
*मॅजिकल पेपर स्टार*

https://youtu.be/XYWFs7X-SDQ
*आकर्षक फुले*

https://youtu.be/xHpX6t0zuJg
*जुन्या साडीपासून पायपुसणी*

https://youtu.be/h8ucNafhCZo
*कागदाच्या गुंडाळ्यांपासून गणेश मखर*

https://youtu.be/70YSYGGvWTE
*कागदाच्या गुंडाळ्यांपासून पेन स्टॅन्ड*

https://youtu.be/0woM_jhJ9NU
*कागदी बॅचेस*

https://youtu.be/CllM6I20k9Y
*जुन्या पत्त्यांपासून फोटो फ्रेम*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आणखी शैक्षणिक साहित्य उपक्रम प्रकल्प यांसाठी चॅनलला अवश्य भेट द्या.
*सबस्क्रिब्शनसाठी लिंक वर क्लिक करा...*
👇🏻
https://www.youtube.com/channel/UCvS2qqUWS8iGcTre6fSA6ZA
🙏🏻🌺💐🌹🌸🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

विषय संपूर्ण तयारी व्हिडीओ

*डिजिटल साक्षर यु ट्यूब व्हिडीओ चॅनेल*
*(इंग्रजी , गणित , विज्ञान , समाजशास्त्र इत्यादी विषयांचे इयत्ता 5 वी 10 वी एकाच ठिकाणी संपूर्ण व्हिडीओ)*
 
*विषय :-*
  *विज्ञान विषय संपूर्ण तयारी*

इयत्ता 10 वी भाग 1
(81 व्हिडीओ)
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxGpgom3goiMNJLrTHBnSo7j

इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2
(48 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFI_Qc8RMtJmRXBeA4NW6WQ

इयत्ता 9 वी सामान्य विज्ञान
( 197 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxG_N2I4prjL3RcmMPV4r9zv

इयत्ता 8 वी सामान्य विज्ञान
(142 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxEqoJHb1Nn-2uMnOj-rOZDl

इयत्ता 7 वी सामान्य विज्ञान
(160 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxF2IlbAT8jM7N3VyNzWpOiu

इयत्ता 6 वी सामान्य विज्ञान
(104 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFZJSmd5XuVb3Vk-RBUjjoN

इयत्ता 5 वी परिसर अभ्यास
(149 व्हिडीओ)

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxF-sH5at7vIkpQHblNEZhFt


*गणित विषय संपूर्ण तयारी*

10 वी गणित भाग 1
41 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxHN-QldvN43Evkre55fvsgT

10 वी गणित भाग 2
22 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFXFum6oB_DGZQcTahjqFB6

9 वी गणित भाग 1
46 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFDt7fNsoNx8mSj6RsXP9-Z

9 वी गणित भाग 2 
38 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxH4Me0Q8U0CoOTOmiCl4Hyg

8 वी गणित
85 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxGkl1z4ZMosjjQGZkBmmCGp

7 वी गणित
102 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxGAiRLGPtwTq53xCvZOzghh

6 वी गणित
98 व्हिडीओ

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxHEW9BzD4bIPU23kwlj2kZ9

5 वी गणित
104 व्हिडीओ

https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFX3hvoKPf8GNST0cc45MH4

*इंग्रजी विषय संपूर्ण तयारी*
9 वी इंग्रजी
64 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxF4ck_umSNqJ-WvLvfL3-tZ

8 वी इंग्रजी
74 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFpFLEQ1Gbmo3Qfc0wnw78i

7 वी इंग्रजी
115 व्हिडिओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxHLYL5IE5-ZBmFpapc49wJb

6 वी इंग्रजी
102 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxH1GmUaIB5cK-TokBJhLmfY

5 वी इंग्रजी
119 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxGJir2MuAG-4Z8yJ6dBcmKV

*समाजशास्त्र विषय संपूर्ण तयारी*

*इयत्ता 9 वी* विषय - इतिहास
55 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxGYgDUh_5SDZmmEZGmwXt88

विषय - राज्यशास्त्र
27 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxF9F85t82aWPnru95vgY1q3

 विषय - भूगोल
55 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxHuPoL3Jr_mSsz0CH6MxUjI

*इयत्ता 8 वी* विषय - इतिहास
102 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFfb7K8evEDpsHfbTRckTCV

विषय - ना. शास्त्र
31 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFlUhzPWc2hMvWuXUDWVHHH

विषय - भूगोल
78 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxEFzaMZVlpyf7NbGY2Kyw2w

*इयत्ता 7 वी*  विषय - इतिहास
88 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxEx8gFo13TFsJreIbAfeS4q

विषय - ना शास्त्र
29 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFctmwDj0y7SnAQ0RXI0Yel

विषय - भूगोल
72 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxE6R8ryJSwFrkAwBy0k9I3g

*इयत्ता 6 वी*  विषय - इतिहास
63 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxHvfZ8ifLEasts6nmEUD8AP

विषय - ना शास्त्र
25 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxEuQY-lmh_T0_46Y66xvZX_

भूगोल
54 व्हिडीओ
https://www.youtube.com/playlist?list=PLoj-HZxkBkxFchky7OPBFpOshO8Am_Yct

To be continued.....

#Stay Home  #Stay Safe

🔰 संकलन 🔰
*प्रदिप प्रभाकरराव पोलकर*
              (उपशिक्षक)
न्यू इंग्लिश स्कूल, एरंडोली.
    *Mob No 7588588704*

शैक्षणिक व्हिडीओ

शैक्षणिक व्हिडीओ

https://youtu.be/X8Jf9kQ1iGg
 _💥Online निकाल कसा तयार करायचा💥_
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://youtu.be/w-vjyy5Am6U
 _💥Smart PDF कशी तयार करायची💥_
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
https://youtu.be/oAbqDFsvr54
_💥फ्लिपबुक कसे तयार करायचे💥_
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://youtu.be/9qXfrnya7RM
 _💥हलणारी text image कशी तयार करायची💥_
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
https://youtu.be/s5O28sM7YE8
 _💥Google form quiz कशी तयार करायची💥_
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://youtu.be/S1m2GFLD73U
 _💥Testmoz मध्ये टेस्ट कशी तयार करायची💥_
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
https://youtu.be/dW7Rhgm_MXY
 _💥Photo PDF कशी तयार करायची💥_
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
https://youtu.be/6VECmEDe538
 _💥Text PDF कशी तयार करायची💥_
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
https://youtu.be/s5O28sM7YE8
 _💥Blend collage डिजिटल शैक्षणिक साहित्य कसे तयार करायचे💥_
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
*👍सर्वांसाठी खुपच उपयुक्त👍नक्की पहा👍*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚
     *☀️vanita more☀️*
🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚   
     ➖➖Ⓜ️🅰️🅿️➖➖
*महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती टीम*

Sunday 19 April 2020

जगातील देश : जपान







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे


जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे
जगातील देश : जपान
जपान (En-us-Japan.ogg उच्चार )(जपानी- 日本) हा पूर्व आशियामधील एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्रचीनउत्तर कोरियादक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. जपानी भाषेत "जपान" या नावासाठी वापरल्या जाणाऱ्या कांजीचा (日本) (कांजी = चिनी / जपानी भाषेचे वर्ण) अर्थ "सूर्य उगम" असा होतो. त्यामुळे आणि जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला उगवत्या सूर्याचा देश असे संबोधण्यात येते.
जपान
日本
निप्पोन-कोकू

जपान
जपानचा ध्वजजपानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत:

किमी गा यो (君が代?)
जपानचे स्थान
जपानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
टोकियो
अधिकृत भाषाजपानी
सरकारवैधानिक राजतंत्र व सांसदीय लोकशाही
 - राष्ट्रप्रमुखसम्राट नारुहितो (राजा)
 - पंतप्रधानशिंझो आबे
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवसफेब्रुवारी ११इ.स.पू. ६६० 
क्षेत्रफळ
 - एकूण३,७७,९४४ किमी (६२वा क्रमांक)
 - पाणी (%)०.८
लोकसंख्या
 - २०१११२,७९३,६०,०००[१] (१०वा क्रमांक)
 - घनता३३७/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण५.०६८ निखर्व[२] अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३२,६०८ अमेरिकन डॉलर (२३वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२०१०) ०.८८४[३] (अति उच्च) (११वा)
राष्ट्रीय चलनजपानी येन (JPY)
आंतरराष्ट्रीय कालविभागजपानी प्रमाणवेळ (JST) (यूटीसी+९)
आय.एस.ओ. ३१६६-१JP
आंतरजाल प्रत्यय.jp
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक८१

जपान प्रशांत महासागरामधील एकूण ६,८५२ बेटांवर वसला असून होन्शूक्युशूशिकोकू व होक्कायडो ही येथील चार प्रमुख बेटे आहेत. सुमारे १२.८ कोटी लोकसंख्या असलेल्या जपानचा लोकसंख्येच्या बाबतीत जगात दहावा क्रमांक लागतो. टोकियो हे जपानमधील सर्वात मोठे शहर, राष्ट्रीय राजधानी व जगातील सर्वात मोठे महानगर आहे. प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीनच्या खालोखाल) आहे. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेले लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत.
जपान भौगोलिकदृष्ट्या ६,८५२ बेटांचा स्ट्रॅटोव्होल्कॅनिक द्वीपसमूह आहे. होन्शूक्युशूशिकोकू व होक्कायडो या चार मोठ्या द्वीपगटांनी जपानच्या जमीनी क्षेत्राचा ९७% भाग व्यापला आहे आणि त्यांना मुख्य बेट म्हणून ओळखले जाते. जपान देश ८ विभागांतील ४७ प्रांतांमधे विभागला आहे, ज्यात होक्कायडो सगळ्यात उत्तरेकडील, आणि ओकिनावा सगळ्यात दक्षिणेकडील प्रांत आहे. जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ९८.५% लोक हे जपानचे मूळ निवासी आहेत. ९.१ दशलक्ष लोक टोकियोमध्ये राहतात.

Broom icon.svg



पुराणवस्तुसंशोधनाने असे सूचित केले की जपानची लोकभूमी पाषाण युगआच्या अखेरिस वसावली गेली. पहिल्या शतकातील जपानची लिखित माहिती चिनी इतिहासआच्या ग्रंथांमध्ये आहे. इतर क्षेत्रांमध्ये, मुख्यत्वे चीन, विशेषत: पश्चिम युरोपातील अलगावच्या कालावधीनंतर, जपानच्या इतिहासाचे वर्णन केले आहे.
12 व्या शतकापासून ते 1868 पर्यंत जपानवर साम्राज्याच्या नावावर राज्य शागन्सने केले. जपानने 17 व्या शतकाच्या सुरुवातीस एकेरीचा कालावधी ओलांडला जो 1853 मध्ये संपुष्टात आला होता जेव्हा युनायटेड स्टेट्स जपानला पश्चिमेत उघडण्यासाठी दबाव आणला. जवळपास दोन दशके अंतर्गत चळवळ आणि बंडखोरांचा सामना केल्यानंतर, इ.स. 1868 मध्ये आणि इ.स. 1968 मध्ये चोशु आणि सत्सुमा-आणि साम्राज्य साम्राज्याच्या स्थापनेमुळे इम्पीरियल कोर्टाने आपली राजकीय सत्ता पुन्हा मिळवली. 19व्या आणि 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात, पहिले चीन-जपानच्या युद्धांत विजय, रशिया-जपानचे युद्ध यांनी जपानमध्ये वाढत्या युद्धनियमांच्या काळात आपले साम्राज्य विस्तारित करण्याची परवानगी दिली. 1937 चे दुसरे सिओ-जपानी युद्ध 1941 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या भागामध्ये विस्तारले, ते 1945 मध्ये हिरोशिमा व नागासाकी आणि जपानी शरणागतीवरील आण्विक बम-विस्फोटानंतर समाप्त झाले. 3 मे 1947 रोजी सुधारित संविधानाने एससीएपीचा कब्जा घेत असतांना, जपानने सम्राट आणि राष्ट्रीय आहार नावाची निर्वाचित विधानमंडळ असलेल्या एका एकात्म संसदीय संवैधानिक राजेशाही कायम राखली आहे