महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Wednesday 1 July 2020

लर्निंग फ्रॉम होम महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक समजून घेवूया.

कोव्हीड १९ या विषाणुजण्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागु करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया  सुरू राहण्यासाठी लर्निंग  फ्रॉम होम ही संकल्पना राबवविणे बाबत.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक:२०२०/प्र.क्र.८४/एस.डी.-६ मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरु चौक मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक : २८ एप्रिल, २०२०

प्रस्तावना:

सध्या देशभरामध्ये संचारबंदीची परिस्थिती आहे. जगभरातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अशा गंभीर परिस्थीतीत वाहतुकीचे प्रमाण कमी झाल्यामुळे, कारखाने बंद असल्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पर्यावरणाप्रती अधिक सजग करता येऊ शकते. संचारबंदीच्या काळामध्ये पालक, मुले, सर्व कुटुंबीय घरातच बंदिस्त झाले आहेत. अशा काळात घर हेच एक प्रयोगशाळा बनवता येऊ शकेल का? घरातील वेगवेगळे साहित्य, स्वयंपाक घरातील वस्तू, त्यांची रचना व कार्य तसेच या वस्तूंच्यामागचे विज्ञान याबाबत मुलांमध्ये आपल्याला जागृकता निर्माण करता येऊ शकते.


कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. शालेय स्तरावरील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. सद्य:स्थितीत राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी पुढील कालावधीकरीता वाढविण्यात आली आहे. संचारबंदीच्या या काळात प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाच्या प्रवाहात असणे महत्त्ाचे आहे. या मुलांना अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेत ठेवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. संचारबंदीच्या या काळात मुलांच्या मनामध्ये असलेली भिती, चिंता दूर करण्याचा प्रयत्नही करणे आवश्यक आहे. हाती असलेल्या वेळेचा सदुपयोग करून काही नव्या गोष्टी करता येऊ शकतात. यासाठी तंत्रज्ञानाच्या या युगात ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आता उपयुक्त ठरणार आहे. त्याआधारे मुलांना आता स्वयंअध्ययन करता येईल. सद्य:स्थितीत शालेय अभ्यासक्रमातील मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी, हिंदी, इतिहास व नागरीकशास्त्र, भूगोल, कला, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांच्या अभ्यासाची आता नवीन दिशा ठरविता येईल. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकेल.मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी सध्या खूप वाव आहे. पालकांना मुलांचा कल, छंद, वृत्ती, दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला काही मदत करता येऊ शकेल का? त्यासाठी प्रश्नावली त्यांना पुरवता येऊ शकेल का? याचाही विचार करता येऊ शकतो. सध्या शालेय अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापनाचे कार्य बंद असले तरी मुलांचे अध्ययन मात्र बंद नाही. ते सतत चालू असते. पण अभ्यासापलीकडच्या या अध्ययनाला शालेय अभ्यासाची जोड देता आली तर शिक्षण हे अधिक समृद्ध, सखोल आणि समजपूर्वक करता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकेल का?


कोरोना (COVID-१९) या विषाणूच्या प्रसारामागील विज्ञान समजावून घेतलं तर असं लक्षात येतं की, हा विषाणू माणसांच्या सभा संपर्कामुळे (Community transfer) मोठ्या प्रमाणात प्रसारित होतो. त्यामुळे सध्या जगभरामध्ये अनिवार्य कामासाठी भेटणाऱ्या व्यक्ती एकमेकापासून अंतर ठेवून काम करत आहेत. एकमेकांना अभिवादन करण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत.


मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीतील अभिवादनाची पद्धती जगभरामध्ये वापरली जात आहे. या दृष्टिकोनातून भारतीय संस्कृतीला जगामध्ये एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृतीचा वारसा मुलांना समजावून सांगून त्याचे महत्त्व पटवून देण्याची ही योग्य वेळ आहे.


शासन परिपत्रक:

             महाराष्ट्र शासनाने या पूर्वीपासूनच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी उपाययोजना केलेल्या आहेत. त्या सर्व पालकांपर्यंत आणि मुलापर्यंत पोहोचून आपले शिक्षण आपण या काळात सुद्धा चालू ठेवू शकतो. त्यासाठी वेगवेगळी संकेतस्थळे, पोर्टल, प्लॅटफॉर्म आणि शैक्षणिक एप्लिकेशन्स यांचा वापर शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा. तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सेक्युरिटी संदर्भातही विद्यार्थी आणि पालक यांचे सतत उद्बोधन होणे आवश्यक आहे.सद्य:स्थितीमध्ये अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू राहण्यासाठी काही महत्त्वाच्या संसाधनांची माहिती शासन सर्वाना करून देत आहे. त्यांचा अधिकाधिक वापर करण्याची आवश्यकता आहे.या करिता घरी राहुन शिक्षण ( Learning From Home) ही संकल्पना राबविण्यासाठी खालील संसाधनाची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून लनींग फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणावी.

9.DIKSHA: प्रत्येक शिक्षक व विद्यार्थी यांना मोफत आणि मुबलक प्रमाणात ई-लर्निंग साहित्य मिळावे म्हणून केंद्र शासन (MHRD) आणि महाराष्ट्र शासनाने DIKSHA ई-लर्निग प्लॅटफॉर्म सुरु केला आहे.


DIKSHA वर सद्य:स्थितीमध्ये इयत्ता १ ली ते १०वी साठी मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेमधील ९००० पेक्षा अधिक ई-लर्निंग साहित्य उपलब्ध आहे. या वर उपलब्ध ई-साहित्यामध्ये प्रामुख्याने इंटरॅक्टिव व्हिडिओ, संकल्पनेवर आधारित व्हिडिओ, उपक्रमावर आधारित व्हिडिओ, बौद्धिक खेळस्वरुपातील गेम्स, विविध वर्कशिट, इंटरॅक्टिव प्रश्नपेढी इत्यादींचा समावेश आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांनी देखील DISKHA वरील ई-साहित्याची निर्मिती केली आहे. DIKSHA वरील उपलब्ध ई साहित्याचा वापर करून विद्यार्थी घरबसल्या आपले अध्ययन सुरू ठेवू शकतात तसेच पालक याचा वापर करून विद्यार्थ्यांचा अभ्यास घेऊ शकतात.


अ. इयत्ता १ली ते १०वी साठीचे DIKSHA मोबाईल अॅप : इयत्ता १ली ते १०वी च्या राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये Q.R.Code देण्यात आले आहेत. या Q.R.Code ला शिक्षकांमार्फत तयार करण्यात आलेले ई-लर्निंग साहित्य जोडलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी काही स्वयं अध्ययनावर आधारित उपक्रमांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे. हे सर्व साहित्य पाठयपुस्तकातील QR कोड DIKSHA अॅप वापरून स्कॅन केल्यावर सहज पाहता येणार आहे. तसेच पाठ्यपुस्तक नसल्यास सर्व साहित्य DIKSHA अॅप मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून देखील पाहता येणार आहे. हे साहित्य ऑफलाईन वापरण्याची सुविधाही देण्यात आली आहे. DIKSHA अॅप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.diksha.app

आ. इयत्ता १ ली ते १०वी साठीचे DIKSHA वेब पोर्टल : संगणक व लॅपटॉप वर देखील DIKSHA मधील ई-साहित्य पाहण्यासाठी DIKSHA वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यात इयत्ता १ ली ते १० वी च्या सर्व विषयांचे ई-साहित्य पाहता येते. DIKSHA वेब पोर्टल वर ई-साहित्य पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

www.diksha.gov.in/explore

इ. क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग (सीसीटी) प्रश्न : इयत्ता आठवी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन, गणित आणि विज्ञान साक्षरतेवरील cCT आठवड्यातून DIKSHA वर अपलोड केल्या जातात. CCT सरावासाठी नवीन प्रश्न दर सोमवारी अपलोड केले जातात आणि गुरुवारी उत्तरे दिली जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार कौशल्य निर्माण करण्याची चांगली संधी उपलब्ध होते. हे प्रश्न बघण्यासाठी खालील URL चा वापर करावा. CCT मार्फत सदर उपक्रम इतर इयतांसाठी लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

https://diksha.gov.in/resources/play/collection/do 31290608850520473612338?contentTy pe=TextBook

२. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, 'बालभारती : पाठ्यपुस्तक मंडळ, बालभारती मार्फत इयत्ता १ ली ते १२ वी च्या राज्य अभ्यासक्रमावर आधारीत पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात येते. यास अनुसरून खालीलप्रमाणे अध्ययन साहित्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.अ. ऑनलाईन पाठ्यपुस्तके: इ.१ ली ते १२ वी साठीची सर्व पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी बालभारती वेबसाईट - www.ebalbharati.in   या संकेतस्थळावर जाऊन PDF BOOKS DOWNLOADING मधून इयत्ता १ ली ते १० वीची राज्य अभ्यासक्रमावरील एकूण दहा भाषा माध्यामातील पाठ्यपुस्तके PDF स्वरूपात डाऊनलोड करावी. तसेच इयत्ता ११ वी व १२ वी ची मराठी आणि इंग्रजी या भाषा माध्यमातील PDF स्वरूपातील पाठ्यपुस्तके डाऊनलोड करावी. पाठ्यपुस्तके डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.

www.ebalbharati.in

http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook12.aspx

आ. ई-बालभारती : पाठ्यपुस्तक मंडळाने ई- बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमातील सर्व विषयांचे ई - लर्निंग साहित्य तयार करण्यात आलेले आहे. या साहित्यामध्ये प्रत्येक पाठाचे व्हिडीओ अॅनिमेशनसह देण्यात आले आहेत. पाठावर आधारीत स्वाध्याय, प्रश्नपेढी व काही कृती देण्यात आल्या आहेत. हे साहित्य ई-बालभारतीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सदर साहित्य डाऊनलोड करून ऑफलाईन स्वरूपात वापरता येते. यासाठी पुढील लिंकचा वापरावी. 

https://learn.ebalbharati.in/

 https://play.google.com/store/apps/details?id=com.EBalBharati.Student


इ.बोलकी बालभारती (Talking Books) : ई- बालभारतीच्या माध्यमातून इयत्ता ८ वी ते १० वी च्या दिव्यांग (दृष्टी संदर्भात ) तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी माध्यमाची सर्व भाषा विषयांची Talking Books तयार करण्यात आली आहेत. ती ऑडीओ स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे श्रवण करता येईल. त्यासाठी पुढील लिंक वापरावी.

https://learn.ebalbharati.in/

ई. इयत्ता ८ वी ते १० वी विज्ञान, भूगोल, संस्कृत विषयाचे व्हिडीओ स्वरूपातील साहित्य :

बालभारतीने पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी या संस्थेच्या मदतीने संयुक्तरीत्या इयत्ता ८ वी ते १० वी विज्ञान , भूगोल , संस्कृत विषयाचे व्हिडीओ स्वरूपातील साहित्य तयार करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार विषयनिहाय पाठांच्या सादरीकरणाचे व्हिडीओ, प्रात्यक्षिक कार्याचे व्हिडीओ अशा स्वरुपाचे साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी खालील लिंक वापराव्यात.


https://www.youtube.com/user/ERCJPP

http://www.diksha.jnanaprabodhini.org/

https://learn.ebalbharati.in/

https://www.youtube.com/channel/UYCacnAJUq6dkmYrvb401cRA


उ. बालभारती YouTube वाहिनी : पाठ्यपुस्तक मंडळाने युट्यूब वाहिनी सुरू केलेली आहे. यामध्ये इयत्ता ८ वी ते १० वी चे विज्ञान, भूगोल आणि संस्कृत विषयांचे पाठनिहाय संकल्पना, घटक, उपघटक व प्रात्यक्षिक कार्य संदर्भातील व्हिडीओ उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

याशिवाय इयत्ता ११ च्या अभ्यासक्रमाचे संदर्भात विद्यार्थी, शिक्षक यांनी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कशी अवलंबवावी याबाबतची माहिती देणारे अभ्यासमंडळ तज्ज्ञांचे व्हिडीओ उपलब्ध करून दिले आहेत. त्यासाठी खालील लिंक चा वापर करावा.


https://www.youtube.com/channel/UYCacnAJUqbdkmYrvb401cRA

ए. पाठ्यपुस्तक मंडळाचे ई-बालभारती अॅप : Google play Store मधून ebalbharati App डाऊनलोड करावे. यावर आपले खाते उघडण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. सदर ई बालभारती अॅपवर ऑडिओ-व्हिडिओ इंटॅरॅक्टिव्ह स्वरूपात साहित्य उपलब्ध आहे. सदर साहित्य एकदाच डाऊनलोड करून ते पुन्हा पुन्हा ऑफलाईन वापरण्याची सोय आहे.

https://play.google.com/store.apps.details?id=com. EBalBharati 

ऐ. किशोर मासिक : पाठ्यपुस्तक मंडळामार्फत किशोर मासिक तयार करण्यात येते. १९७१ पासून ते चालू महिन्यापर्यंतचे असे ४९ वर्षातील सर्व अंक आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना बालभारतीच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपात अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.त्यासाठी
 http://kishor.ebalbharati.in/Archive/       लिंकचा वापर करावा.

३. अवांतर वाचनासाठीची वेबसाईट व अॅप्लीकेशन

अ. National Digital Library of India: विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या भाषांमधील ८०००० पुस्तके ई - बुक स्वरूपात या वेबसाईट वर उपलब्ध आहेत.

 https://ndl.iitkgp.ac.in

आ. Bolo: वाचनासाठी चे मोबाईल अॅप्लीकेशन :Google द्वारा निर्मित Bolo हे अॅप्लीकेशन मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे. त्या संदर्भातील लिंक पुढीलप्रमाणे आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.seekh


8.NROER: इ.१ ली ते १२ वी साठीच्या सर्व विषयांसाठी ई-साहित्य संग्रह : राष्ट्रीय पातळीवर इ.१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले सर्व ओपन सोर्स इ-साहित्य नॅशनल रीपॉझिटरी ऑफ ओपन एज्युकेशनल रीसोर्सेस येथे उपलब्ध आहेत. NROER मध्ये विविध भाषेतील ई साहित्य उपलब्ध आहे. यासाठी खालील URL चा वापर करावा.

http://nroer.gov.in/welcome
५. e -Pathshala : NCERT ने इयत्ता १ ली ते १० वी साठी विविध प्रकारचे ई साहित्य वर विविध भाषेत अपलोड केली आहेत. यासाठी खालील URL चा वापर करावा.

http://epathshala.co.in

http://epathshala.gov.in

६. SWAYAM: हा राष्ट्रीय ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित (इयत्ता नववी-बारावी) आणि उच्च शिक्षण (पदवीधर आणि पदव्युत्तर कार्यक्रमांतर्गत) चे १९०० ऑनलाईन अभ्यासक्रम देण्यात आले आहेत. यासाठी खालील URL वापरावे.

https://swayam.gov.in

७. SWAYAM PRABHA: यामध्ये शैक्षणिक सामग्री २४/७ प्रसारित करणारे ३२ डीटीएच टीव्ही चॅनेल आहेत. डीडी, फ्री डिश सेट टॉप बॉक्स आणि एन्टीना वापरून हे चॅनेल देशभरात पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. चॅनेलचे वेळापत्रक आणि इतर तपशील पोर्टलवर उपलब्ध आहेत. या चॅनेलमध्ये शालेय शिक्षण (इयत्ता नववी-बारावी) आणि उच्च शिक्षण (पदवीधर आणि पदव्युत्तर कार्यक्रमांतर्गत) या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. यासाठी खालील URL वापरावे. तसेच या अंतर्गत NCERT चे किशोर मंच २४x७ टीव्ही चॅनेल साठी चॅनेल ३१ वर भेट देता येईल.

https://swayamprabha.gov.in

८.PODCAST: CBSE ने एक पॉडकास्ट अॅप सीबीएसई-शिक्षा वाणी लॉन्च केले असून हे अँड्रॉइड फोन वापरकर्त्यांसाठी Google Play Store वर उपलब्ध आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापकांना पॉडकास्टद्वारे महत्त्वपूर्ण माहिती प्रसारित करण्यासाठी, याचा उपयोग होतो.

स्टोरी टेलिंग पासून ते विविध शैक्षणिक व कौशल्याधारित विषयांपर्यत तज्ञांद्वारे विविध विषयांवर ऑडिओ फाइल तयार करणे यामुळे शक्य झाले आहे.


९. National Digital Library of India: नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षक, विद्यार्थी, व्याख्याते, विद्यार्थी आणि शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी व्यासपीठ आहे. यासाठी


 https://ndl.iitkgp.ac.in  हे URL वापरा

१०. विज्ञान विषयासाठी सिम्युलेशन मोबाईल अॅप्लीकेशन - PhET विज्ञान विषयातील विविध प्रयोग आभासी प्रयोगशाळेच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी इंटरॅक्टीव्ह स्वरूपाचे अॅप खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=edu.colorado.phet.android_app

११. Google Classroom: शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना प्रकल्प, गृहपाठ, अभ्यास, ई-साहित्य पुरवण्यासाठी मोबाईल अॅप्लीकेशन -Google Classroom. यानुसार अध्ययन साहित्याची देवाण घेवाण करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म उपयुक्त आहे.


https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.classroom

१२. Google Hangouts: विद्यार्थ्यांशी ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल ने संवाद साधण्यासाठी/अध्ययन - अध्यापनासाठी मोबाईल अॅप्लीकेशन Google Hangouts. Google चे हे अॅप्लीकेशन शिक्षक - विद्यार्थी - पालक यांच्यात ऑडिओ किंवा व्हिडिओ स्वरूपात संवाद साधण्याचे उत्तम प्लॅटफॉर्म आहे. याकरिता पुढील लिंक वापरता येईल.

https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.meetings 

१३. ई-साहित्य उपलब्ध असलेला आंतरराष्ट्रीय संग्रह - Global Digital Library : आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या देशांत बनवल्या गेलेल्या ओपन रिसोर्स व ई-साहित्याचा प्लॅटफॉर्म मोबाईल ऍप्लिकेशन स्वरूपात खालील लिंकवर उपलब्ध आहे.

https://play.google.com/store/apps/details?id=io.digitallibrary.reader