महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

भारताची मंगळयान मोहीम

भारताची मंगळयान मोहीम फत्ते
इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस
सकाळी - . ३६ वाजता 
आणखी मंगल कार्य करण्याची प्रेरणा मंगळ मोहीम आम्हाला देत आहे - मोदी
सकाळी - . ३० वाजता
आज देशात आनंदोत्सव व्हायला हवा, शाळा - महाविद्यालयांनी किमान पाच मिनिटे एकत्र येऊन टाळ्यांच्या कडकडाटात शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले पाहिजे - मोदी
सकाळी - . २२ वाजता
भारताने अंतराळ मोहीमेत प्रगत देशांनाही मागे टाकल्याचा सार्थ अभिमान आहे - मोदी
सकाळी - . २० वाजता
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे - मोदी
सकाळी - . १५ वाजता
मोदींचे गौरवोदगार. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे. त्यांना ती सवय लागली आहे.
सकाळी - . १२ वाजता
मंगळ मोहिमेत भारत यशस्वी झाला आहे, मात्र यशासोबतच नवीन आव्हानंही येतात. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही. भारतीय शास्त्रज्ञ या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम - मोदी
सकाळी - . १० वाजता
पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही देशाला मंगळ मोहीमेत यश आलेले नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेच (इस्रो) ही किमया साधली - मोदी
सकाळी - .०९ वाजता
भारताने इतिहास घडवला - मोदी
सकाळी - .०८ वाजता
जगात देशाचे नावाचा दबदबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देशवासियांना संबोधित
सकाळी - .०० वाजता
Description: http://stm.india.com/marathi/sites/default/files/ByQ8_cWIgAAkwBq.jpg
What is red, is a planet and is the focus of my orbit?
— ISRO's Mars Orbiter (@MarsOrbiter) September 24, 2014
सकाळी - .४८ वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
सकाळी - .४७ वाजता
बंगळुरु : अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी .४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.
सकाळी - .४६ वाजता
मंगळयान इंजिन सुरु
मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्तानापन्न
सकाळी - .४५ वाजता
.४५ मंगळाच्या कक्षेत स्थिरावले
सकाळी - .१० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या नियंत्रण कक्षेत
नवी दिल्ली : राज्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात रेड प्लॅनेट मंगळाकडून गुडन्यूज आली आहे. मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी .२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहणार आहे. ते 7.45 वाजता मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.
तब्बल 300 दिवस बंद स्थितीत असलेलं हे इंजिन पृथ्वीवरच्या कंट्रोल रूममधून सुरू करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले. तब्बल 4 सेकंदांसाठी हे इंजिन सुरू राहिलं. इंजिन सुरू होत असल्यामुळे आता बुधवारचा मंगळयानाचा मंगळ कक्षेतला प्रवेश शक्य होणार आहे. या यानानं 65 कोटी किलोमीटरचा म्हणजे जवळजवळ 99 टक्के प्रवास पूर्ण केलाय.
मंगळ ग्रह आणि पृथ्वी यामधील अंतर 21 कोटी किलोमीटर असलं तरी गुरूत्वाकर्षणाचा वापर करून हे यान मंगळाकडे जात असल्यामुळे हे अंतर कैक पटींनी वाढलंय.


मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर
Description: मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर
नवी दिल्ली : 24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे  पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.
भारताचा मिशन मार्स यशाच्या अगदी जवळ पोहोचलाय. 120 कोटी भारतीयांसह साऱ्या जगाच्या नजरा भारताच्या मिशन मार्सवर लागल्यात.. यापूर्वीही चीन आणि जपानंनं मंगळावर पोहोचण्याचे प्रयत्न केलेत मात्र त्यात हे दोन्ही देश अपयशी ठरले. त्यामुळे जर भारताला यात यश मिळालं तर भारत हा मंगळावर पोहोचणारा आशियाखंडातील पहिलाच देश असेल.
1960 पासून ते आतापर्यंत मंगळावर तब्बल 45 अभियान करण्यात आले ज्यापैकी एक तृतियांश अयशस्वी झालेत. आतापर्यंत कोणताही देश पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला नाहीये.. आणि भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे..यापूर्वी भारताच्या चांद्रयानाला आपल्या मिशनपर्यंत पोहोचण्यासाठी केवल चार लाख किलोमिटरचं अंतर पार करावं लागलं होतं
मात्र मंगळयानाला चाळीस कोटी किलोमीटर अंतर कापावं लागलंय..मंगळ पृथ्वीपासून 200 ते 400 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. त्याची कक्षा अंडाकृती आहे. त्यामुळे हे अंतर कापायला मंगळयानाला तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी लागला. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्यावर संदेश पाठवण्यासाठी केवळ 20 मिनिटं लागतील आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मंगळयानालाही 20 मिनिटांचा अवधी लागेल. म्हणजेच संदेशांच्या देवाणघेवाणीला 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
भारताचा मंगळयान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. तो मंगळाच्या पृष्ठ भागाच्या 250 ते 8000 किलोमिटर दूर लाल ग्रहाच्या कक्षेत फिरत राहील आणि कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवर राहील.. मंगळावर पाणी जीवसृष्टी आहे का, मीथेन गॅसचं अस्तीत्त्व आणि शोध तसंच मंगळावरील खनिज संपत्तीचा शोधघेणं हे या मंगळयानाचं मुख्य काम असणार आहे.
मंगळयानावरून पाठवले जाणारे संदेश ग्रहण करण्यासाठी चार अर्थस्टेसन्स स्थापन करण्यात आलेत. यात अमेरिकेच्या नासाचीही मदत घेण्यात आलीये. त्यामुळे आता लवकरच मंगळावर मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे. कारण आता मंगळ भारताच्या मुठीत असणार आहे.
Description: C:\Documents and Settings\abc\My Documents\My Pictures\115097-mom-major-events-2.jpg

 


अंतराळात इतिहास रचणार भारत,
मार्स मिशनचं महत्त्वाचं टेस्टिंग
Description: अंतराळात इतिहास रचणार भारत, ‘मार्स मिशन’चं महत्त्वाचं टेस्टिंग आज
नवी दिल्ली: २४ सप्टेंबर रोजी भारताच्या मंगळ यानानं लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वी इस्रोसोमवारी अतिशय महत्त्वपूर्ण अशा चौथ्या पथ संशोधन कार्यआणि अंतराळ यानाच्या प्रमुख द्रवित इंजिनची प्रायोगिक चाचणी घेण्यासाठी सज्ज आहे.
४४० न्यूटन लिक्विड एपोजी मोटार (एलएएम) इंजिन गेल्या ३०० दिवसांपासून सुप्तावस्थेत आहे. त्याची किमान सेकंदासाठी चाचणी घेण्यात येईल. ही चाचणी यशस्वी ठरली, तर मंगळ यान मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या यशस्वीतेबाबतचा इस्रोचा आत्मविश्वास अधिक वाढेल.
आम्ही चौथ्या पथ संशोधन कार्य आणि प्रमुख द्रवित इंजिनच्या प्रायोगिक चाचणीसाठी तयार आहोत. त्यासाठी अंतराळ यानाला कमांड देण्यात आले आहेत आणि त्याची तपासणीही पूर्ण करण्यात आली आहे,’ असं इस्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
ही घटना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण ३०० दिवसांपर्यंत निष्क्रिय पडून असलेल्या इंजिनला चाचणीसाठी पुन्हा सुरू केलं जाणार आहे. एलएएम इंजिनची प्रायोगिक चाचणी ही एक परीक्षाच आहे. मंगळाची कक्षा भेदण्याच्या उद्देशाने या इंजिनला दीर्घकाळासाठी सक्रिय करावयाचं आहे, असं हा अधिकारी म्हणाला.
या इंजिनची प्रायोगिक चाचणी .९६८ सेकंदांसाठी .१४२ मीटर प्रति सेकंद वेगानं घेतली जाईल. त्यासाठी किमान .५६७ किलो इंधन खर्च होईल. मंगळ मिशन हे भारताचं पहिलंच आंतरग्रह मिशन आहे. हे मंगळ यान नोव्हेंबर २०१३ रोजी आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या पोलर सॅटेलाईट लाँच व्हिकलच्या (पीएसएलव्ही) मदतीनं प्रक्षेपित करण्यात आलं होतं. हे मंगळ यान बुधवारी लाल ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ६६ कोटी ६० लाख कि.मी.च्या आपल्या प्रवासादरम्यान हे मंगळ अंतराळ यान डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्राच्या बाहेर पडलं होतं.
दरम्यान, सोमवारची योजना अपयशी ठरली, तर आपली दुसरी योजना (बी प्लान) तयार आहे. याअंतर्गत आठ प्रक्षेपकांना दीर्घकाळासाठी सोडलं जाईल. त्यासाठी जादा इंधन लागेल आणि यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करू शकेल, असं इस्रोनं म्हटलंय.  
मिशन मंगळ 
मंगळ ग्रहाकडून आली 'मंगल'वार्ता !
लिक्विड इंजिनाची यशस्वी चाचणी
* 300
दिवस बंद असलेलं इंजिन 'फिट' !
बुधवारी 'मंगळयाना'चा कक्षेत प्रवेश
* '
इस्रो'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
मंगळ यान आणि मंगळ ग्रह यातील अंतर 40 लाख किमीहून कमी
या क्षणी मंगळयानाहून पृथ्वीवर संकेत पोहचण्यासाठी जवळपास 12 मिनिटे लागतात
मंगळयानावर सोपवण्यात लेल्या जबाबदाऱ्या
Description: मंगळयानावर कोणत्या सोपवण्यात आल्यात जबाबदाऱ्या
नवी दिल्ली : भारताचा मंगळयान जेव्हा मंगळाभोवती फिरुलागेल तेव्हा तो आपलं काम सुरु करेल. या मंगळयानावर कोणत्या जबाबदा-या सोपवण्यात आल्यात? त्यावर कोणत्या प्रकारची हायटेक यंत्रणा लावण्यात आलीये, याबाबत माहिती.
इस्त्रोच्या या उपग्रहावर पाच जबरदस्त शोध उपकरणं लावण्यात आलेत. इस्त्रोसाठी महत्त्वाची माहिती गोळाकरणं हे या उपकरणांचं प्रमुख काम असेल. मंगळावर काय आहे? तिथल्या मातीत काय आहे, हे या उपकरणांद्वारे इस्त्रोला कळणार आहे.
ही पाच उपकरणं आहेत LAP अर्थात लिमन अल्फा फोटोमीटर,  MSM अर्थात मिथेन सेंसर फॉर मार्स,MENCA अर्थात मार्स एक्सोफेरिक कंपोजिशन एक्सप्लोरर, MCC अर्थात मार्स करल कॅमेरा किंवा TIR इमेजींग आणि TIS म्हणजेच स्पेक्ट्रोमीटर
या उपकरणांद्वारे मंगळाबाबत तब्बल 30 प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकेल, असा इस्रोचा दावा आहे.

कसं चालेल या पाचही उपकरणांचं काम -
लिमन अल्फा फोटोमटर - मंगळाच्या वरच्या वातावरणातील ड्यूटेरियम म्हणजेच हायड्रोजनच्या कणांचं अस्थित्व किंवा त्यांच्या प्रक्रियेचा शोध घेईल.. या उपकरणाच्या लेंन्स अशा कणांना शोधून कंट्रोल रुममध्ये पाठवेल.
मिथेन सेंसर फॉर मार्स - याद्वारे मंगळावरील मिथेनच्या अस्थीत्त्वाचा शोध लागेल. मिथेन कार्बनच्या एक आणि हायड्रोजनच्या चार अणुंचं मिश्रण आहे. त्याचा अरबवा भाग जरी मंगळावर कुठे असला तरी हे उपकरण त्याचा अचुक शोध लावेल.. असं म्हटलं जातं की मंगळावर मिथेनचं भंडार आहे.
मार्स एक्सोफेरिक कंपोजिशन एक्सप्लोरर - मंगळाच्या वरील वातावरणाची प्राकृतीक संरचना याउपकरणाद्वारे कळू शकेल.. हायड्रोजन, मिथेन नसेल तर मंगळावर अन्य काही आहे का? या उपकरणाद्वारे मंगळावरी कोणत्याही नैसर्गीक खजीन्याचा शोध घेईल.
मार्स करल कॅमेरा - या कॅमे-याद्वारे मंगळाच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले जातील. या कॅमे-याद्वारे 50 किलोमीटरपर्यंतची अचूक छायाचीत्र घेतली जातील कमीत कमी 25 मीटरच्या अंतरावरील कोणत्याही बिंदूवर फोकस करूनही हा कॅमेरा आपलं काम करु शकेल.
स्पेक्ट्रोमीटर - मंगळावरील खनिजांचा शोध घेणारं हे उपकरण आहे. याची किरणं मंगळाच्या पृष्ठभागात खोलवर जाऊन मंगळामध्ये कोणती खनीज संपत्ती दडली आहे याचा शोध घेईल.
भारताचं हे मिशन मंगळ यशस्वी झालं तर मंगळाविषयी भारताकडे अत्यंत महत्त्वाची माहिती असेल.. इतकच नव्हे अंतराळक्षेत्रात भारताची पकड आणखीनच मजबूत होईल यात शंकाच नाही.


No comments:

Post a Comment