महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 16 September 2017

कार्यानुभव उपक्रम यादी


कार्यानुभव उपक्रम
कार्यानुभव =वस्तुनिर्मिती
विद्यार्थ्यांकडुन काय काय तयार करुन घेता येईल.

१) काडीपेटीपासुन बॅग,सोफा पालखी तयार करणे.
२)कागदापासुन विमान,टोपी,होडी तयार करणे.
३)कागद,वनस्पतींपासुन तोरण बनवणे.
४)पताका बनवणे.
५)कापसाची फुलवात बनवणे.
६) पुठ्ठ्यांचा आईस्क्रीम कपांचा तराजु बनवणे.
७)भेटकार्ड बनवणे.
८)प्लॅस्टीक पिशव्या तुकड्यांचा हार बनवणे.
९)खत तयार करणे.
१०)कापसाच्या वस्तु बनवणे.
११)कागदी पिशव्या बनवणे.
१२)कागदी टोप्या बनवणे.
१३)चिंधीपासुन चेंडू बनवणे.
१४)नारळाच्या सोडणापासुन काथ्या तयार करणे.
१५)काथ्यापासुन वस्तु बनवणे.
१६)बांबुच्या वस्तु बनवणे.
१७) वेताच्या वस्तु बनवणे.
१८)फुलांपासुन हार,गजरे,गुच्छ बनवणे.
१९)कागदी घड्यांची चित्रे तयार करणे.
२०)मुर्ती तयार करणे.
२१)ज्वारीच्या धांडांपासुन बैलगाडी चश्मा बनवणे.
२२)कार्डशीटपासुन खोके बनवणे.
२३)कागदी फुले तयार करणे.
२४)काथ्यापासुन पायपुसणी बनवणे.
२५) नारळाच्या टाकाऊ वस्तुंपासुन झोपडी,घरे झाडे बनवणे.
२६)मातीचे घर तयार करणे.
२७)वेतापासुन चटई तयार करणे.
२८)कागदी फुलझाडांची रोपे तयार करणे.
२९)पालखी तयार करणे.
३०)मोरपिसापासुन पंखा टोपी बनवणे.
३१)नारळाच्या करवंटीपासुन फुलदाणी बनवणे.
३२)घरे तयार करणे.
३३)फुले ठेवण्यास परडी तयार करणे.
३४)खोक्यापासुन शिल्प तयार करणे.
३५)पत्रावळी व द्रोण तयार करणे.
३६)आकाशकंदील तयार करणे.
३७)राख्या तयार करणे.
३८)मण्यांच्या माळा तयार करणे.
३९)शंख शिंल्यापासुन सौंदर्याकृती बनवणे.
४०)काथ्यापासुन डस्टर उशी बनवणे.
४१)काथ्यापासुन शिंकाळे तयार करणे.
४२)शिंकाळे तयार करणे.
४३)पंखा तयार करणे.
४४)मातीपासुन प्राणी पक्षी तयार करणे.
४५)साबणाच्या खोक्यापासुन घर रॅक बनवणे.
४६)रद्दी चित्रापासुन भेटकार्ड बनवणे.
४७)नक्षीदार वाॅलपीस तयार करणे.
४८)गोणपाटापासुन पिशवी बनवणे.
४९)बदक पोपट जिराफ कोल्हा ओरिगामी वस्तु बनवणे.
५०)उशी तयार करणे.
५१)बाहुली तयार करणे.
५२)बटवा तयार करणे.
५३)मातीची खेळणी बनवणे.
५४)मातीचा नाग बैल बनवणे.
५५)टोपली तयार करणे.
५६)शंख शिंपल्यांच्या माळा तयार करणे.
५७)उटणे तयार करणे.
५८)रांगोळीचे साचे तयार करणे.
५९)फळे तयार करणे.
६०)पिशव्या पाकीटे तयार करणे
६१)दंतमंजन तयार करणे.
६२)मेणबत्ती तयार करणे.
६३)जाळी तयार करणे.
६४)झाडू तयार करणे.
६५)करवंटीपासुन शोभेच्या वस्तु बनवणे.
६६)जाड ब्राउन पेपरपासुन भौमितिक आकार बनवणे.
६७)फाईल तयार करणे.
६८)जुन्या कागदांपासुन वह्या तयार करणे.
६९)खळ तयार करणे.
७०)पतंग तयार करणे.
७१)पतंगाचा मांजा तयार करणे.
७२)बाहुलीचे कपडे तयार करणे.
७३)आगपेटीपासुन गाड्या सोफा तयार करणे.
७४)आईस्क्रीम चमचे वापरुन खुर्ची तयार करणे.
७५)जुन्या पोस्टकार्डपासुन नरसाळे तयार करणे.
७६)टेबललॅम्प तयार करणे.
७७)खडू तयार करणे.
७८)वॉलहॅंगिंग तयार करणे.
७९)लोकरीपासुन गोंडे तयार करणे.
८०)कागदी मुखवटे तयार करणे.
८१)अंड्याच्या कवचापासुन पिल्लु तयार करणे.
८२)कागदी लगद्यापासुन भांडी तयार करणे.
८३)नीळ तयार करणे.
८४)द्रवरुप साबण तयार करणे.
८५)वायरपासुन पिशवी,फुलदाणी तयार करणे.
८६)लोकरी फुले तयार करणे.
८७)सुतळीपासुन शिंकाळे फोनमॅट तयार करणे.
८८)फोटोफ्रेम तयार करणे.
८९)पेनस्टॅड तयार करणे.
९०)अॅबॅकस तयार करणे.
९१)खोबरेलतेलबाटलीपासुन फुलदाणी तयार करणे.
९२)अक्षता तयार करणे.
९३)हॅंगर तयार करणे.
९४)बॅच बिल्ले तयार करणे.
९५)सुगंधी फिनेल तयार करणे.
९६)थर्माकोलची(पुठ्याची) अक्षरे तयार करणे.
९७)करवंटीस लेस, आरसे ,प्लॅस्टिक फुले ,टिकल्या लावुन नक्षी तयार करणे.
९८)बाळासाठी दुपटे तयार करणे.
९९)कीचैन तयार करणे.
१००)टि व्ही,संगणक,मोबाईल प्रतिकृती तयार करणे.
१०१) कागदी आकाशकंदील
१०२)युरियाच्या गोण्यांपासून हँगिंग गार्डन निर्मिती
१०३)सुतळीपासून वॉलपीस
१०४)सुतळीपासून फोन मँट
१०५)काथ्याकाम पायपुसणी
१०६)काथ्यापासून शिंकाळे
१०७)प्लॅस्टिक बाटली पासून हँगिंग गार्डन
१०८) पेन्सिलीच्या shave पासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे
१०९)आगपेटीपासून वॉलपीस , सोफा,कपाट
११०) मोकळ्या बॉक्सपासून वेगवेगळ्या गाड्या बनविणे
१११)आईसकांड्यापासून बंगला,वेगवेगळ्या  वस्तू बनविणे
११२) ओरिगामी कागदापासून वेगवेगळ्या वस्तू बनविणे
११३)भेट कार्ड
११४)मातकाम विविध फळे,प्राणी ,आकार बनविणे
११५)कोलाजकाम
११६) काचकाम
११७)परिसरातील पानांपासून विविध प्रकारचे आकार ==========================================================
आईस्क्रीम काड्यापासून घर,तोरण,जहाज,तुळस,वाँलपीस,झोपाळा, भौमितिक आकार बनवणे.
शिवणकाम-कापडावर बटण लावणे,कापडापासून पिशवी शिवणे,रूमाल इ.
स्ट्रा,मणी,चाँकलेटचे कागद यापासून हार बनवणे.
प्लस्टिकच्या पेल्यापासून आकर्षक आकाशकंदील
मातकामापासून पक्षी,प्राणी,फळे,भांडी
स्ट्राची बाहुली
कापसाची बाहुली
स्पंजची बाहुली
पायमोज्यापासून बाहुल्या बनविणे.
अक्रोडच्या कवटापासून होडया
भाताच्या साळी खपली पासून अलंकार नेकलेस कानातले इ
चिखल दिवस साजरा करून मातकामा च्या वस्तू तयार करणे.
गेलेले बल यापासून मोर बदक
द्रोणापासून तराजू
१लीटर पाण्याच्या बाटल्यापासून कुंडया
क्रेप कागदापासून फुले
सुपारीपासून भटजी तयार करणे
काडेपेटीपासून वाँलपीस,ट्रक,खुर्ची आगगाडी
थर्माकोलपासून विविध वस्तू
ज्वारीच्या सरकाळीपासून घर बैलगाडी
जुनी साडीपासुन पायपुसनी.
कागदा पासून कान हलवणारा ससा तयार करणे .
उड्या मारणारा बेडूकतयार करणे.
कूंकवाचा करंडा तयार करणे.चहाच्या ग्लासा पासून तराजू
बटणाचा वापर करून बदक करणे
मातीचा वापर करून उठावाचे नकाशे तयारकरणे.
कापसा पासून ससा तयार करणे.
बाहुली तयार करणे.
मण्यांचा वापर करून बांगड्या तयार करणे.
पावडर रिकाम्या डब्यापासून टूथब्रश स्टॅड करणे.
कापसाच्या वाती बणविणे.
कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे.
चिकटकामात विविध डाळींपासून सुंदर कलाक्रती बनविणे
चॉकलेटच्या वेष्टणापासून हार तयार करणे
कागदापासून लिफाफा तयार करणे
नारळाच्या झावळ्यापासून खराटा बनविणे
पाण्याच्या बाटलीपासून फॉवरपॉट  पेनस्टँड
सलाईनच्या बाटल्यापासून झूंबर
शीतपेयांच्या झाकणांपासून तोरण
रिबीनपासून गुलाबाचे फुल
सॉक्सपासून बाहूली
बांगडीच्या फुटलेल्या काचा पासून माला विविध डीज़ाइन बनवने
इको फ्रेंडली गणपती बनवने
दिवाळीत पणत्या रंगविणे.

Tuesday 5 September 2017

शिक्षक दिन

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन

Saturday 2 September 2017

डिजिटल शाळा

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत डिजिटल क्लासचे उदघाटन
🎤🎧💻📲🖥📡🔌💽
विद्यार्थी व शिक्षकांच्या अर्थ साहाय्यातुन बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत *इयत्ता 2री, 5वी, 6वी 7वी* च्या या चार वर्गामध्ये आज डिजिटल क्लास चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खाजगी महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष *मा.श्री.अजित सदाशिव साळुंखे* व दैनिक तरुण भारतचे पत्रकार *मा.श्री.सुहास काजळे*, मुख्याध्यापक *मा. श्री संदीप मस्के*, मुख्याध्यापक *मा.श्री.सुनील बुधावलेे*यांच्या हस्ते करण्यात आले.
📱📱📱📱📱📱📱📱
💻💻💻💻💻💻💻💻
💽💽💽💽💽💽💽💽
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
प्रथम पाहुण्यांच्या हस्ते डिजिटल वर्गांचे बटण दाबून शुभारंभ केले गेले. यावेळी मा.श्री.अजित साळुंखे यांनी इ 6वी च्या वर्गाला 2.1 चे डिजिटल स्पीकर देण्याची ग्वाही दिली. शिवाय पाचवीच्या स्कॉलरशिप वर्गातील मुलांना तरुण भारत चे स्कॉलरशिप अंक देण्याचे  जाहीर केले. श्री. मस्के सरांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले. श्री अभिजित डांगे सरांनी पाहुण्याची ओळख करून दिली. मा.श्री.अजित साळुंखे सरांनी डिजिटल शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. मा.श्री. सुहास काजळे यांनी पालकांना इ लार्निंग चे महत्व स्पष्ट करताना शाळेला आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्याची विंनती केली. "डिजिटल क्लास" या कार्यक्रमात श्री.ननावरे सरांनी सर्वांचे आभार मानले. इ लार्निंगच्या अंतर्गत आज चार वर्गांचे डिजिटल क्लासमध्ये तीन लॅपटॉप, तीन प्रोजेक्टर, प्रोजेक्टर स्क्रीन, मॉनिटरवर मोबाईल स्क्रीन कास्टिंग, डिजिटल साउंड आशा प्रकारचे साहित्य वापरून वर्ग डिजिटल केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निकम सरांनी केले.