महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 2 September 2017

डिजिटल शाळा

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत डिजिटल क्लासचे उदघाटन
🎤🎧💻📲🖥📡🔌💽
विद्यार्थी व शिक्षकांच्या अर्थ साहाय्यातुन बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत *इयत्ता 2री, 5वी, 6वी 7वी* च्या या चार वर्गामध्ये आज डिजिटल क्लास चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खाजगी महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष *मा.श्री.अजित सदाशिव साळुंखे* व दैनिक तरुण भारतचे पत्रकार *मा.श्री.सुहास काजळे*, मुख्याध्यापक *मा. श्री संदीप मस्के*, मुख्याध्यापक *मा.श्री.सुनील बुधावलेे*यांच्या हस्ते करण्यात आले.
📱📱📱📱📱📱📱📱
💻💻💻💻💻💻💻💻
💽💽💽💽💽💽💽💽
🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥
प्रथम पाहुण्यांच्या हस्ते डिजिटल वर्गांचे बटण दाबून शुभारंभ केले गेले. यावेळी मा.श्री.अजित साळुंखे यांनी इ 6वी च्या वर्गाला 2.1 चे डिजिटल स्पीकर देण्याची ग्वाही दिली. शिवाय पाचवीच्या स्कॉलरशिप वर्गातील मुलांना तरुण भारत चे स्कॉलरशिप अंक देण्याचे  जाहीर केले. श्री. मस्के सरांनी कार्यक्रम प्रास्ताविक केले. श्री अभिजित डांगे सरांनी पाहुण्याची ओळख करून दिली. मा.श्री.अजित साळुंखे सरांनी डिजिटल शिक्षणाचे महत्व स्पष्ट केले. मा.श्री. सुहास काजळे यांनी पालकांना इ लार्निंग चे महत्व स्पष्ट करताना शाळेला आर्थिकदृष्ट्या सहकार्य करण्याची विंनती केली. "डिजिटल क्लास" या कार्यक्रमात श्री.ननावरे सरांनी सर्वांचे आभार मानले. इ लार्निंगच्या अंतर्गत आज चार वर्गांचे डिजिटल क्लासमध्ये तीन लॅपटॉप, तीन प्रोजेक्टर, प्रोजेक्टर स्क्रीन, मॉनिटरवर मोबाईल स्क्रीन कास्टिंग, डिजिटल साउंड आशा प्रकारचे साहित्य वापरून वर्ग डिजिटल केले. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निकम सरांनी केले.

No comments:

Post a Comment