महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 26 August 2017

शालेय गणपती उत्सव

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत शाखा मंगळवारपेठ व देशमुख कॉलोनी मध्ये "शालेय गणपती उत्सव" उत्सवात साजरा.
मंगळवारपेठ शाखा
मंगळवारपेठेतील शाखेत  मुख्याध्यापक श्री.मस्के सर यांच्या हस्ते श्री गणपतीचे पूजन करण्यात आले.
सांस्कृतिक विभाग व निकम सर, मोरे बाई ,कणसे सर यांनी सर्व शिक्षकासमवेत  "शालेय गणपती उत्सव" आनंदात गणपतींचे स्वागत केले.
देशमुख कॉलनी शाखा 
देशमुख कॉलनीतील शाखेत श्री बुधावले सरांनी श्रीच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना केली, चव्हाण सर, कणसे मॅडम, कदम मॅडम, कांबळे मॅडम, साठे मावशी यांनीं व मुलांनी आनंदात शालेय गणेशाची पूजा केली







बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत "शालेय गणपती उत्सव" उत्सवात विविध खेळ व फन्नी गेम्स राबवण्यात आल्या.



प्रकल्प कसा असावा

प्रकल्प कसा असावा?

शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे 
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषय – उच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे –
( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकार – निवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करा – सर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची उद्दिष्टे – निवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्य – विषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धती – प्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदन – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरण – संकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या व चित्रांकनासाठी – येथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
( शिक्षकांसाठी )
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंद – यामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापन – यामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.
शालेय प्रकल्पांसाठी यादी 
1. माहिती संकलन –
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह –
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन –
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.5. आदर्श
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.

Saturday 12 August 2017

खेळाडूला आर्थिक सहकार्य

खेळाडूला प्रोत्साहीत मदत

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळा मंगळवारपेठ सातारा
या शाळेची माजी विद्यार्थिनी कु रोहिणी मोरे राज्यस्तरीय
वेटलिफ्टिंग खिलाडू हिची राष्ट्रीय स्तरावर केरळ या ठिकाणी
स्पर्धेसाठी जाणार आहे, त्यासाठी तिला आर्थिक मदत शाळेतील शिक्षकांनी केली, मुख्याध्यापक, महिला शिक्षक, जेन्ट्स शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
 श्री धादमे  सरांनी फुल देऊन तिला प्रोत्साहित केले.




Wednesday 9 August 2017

९ऑगस्ट क्रांतीदिन

बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेत क्रांतिदिन साजरा
कर्यक्रमाचे स्वरूप:
      1) क्रांतिफेरी : सकाळी 8 ते 10 ,
           ठिकाण : राजवाडा ते फाशीचा वड
      2) समूहागीत गायन : इयत्ता 1 ली ते 7 वी च्या मुलांचे समूहागीत गायन झाले.
      3) क्रांती घोषणांचे आयोजन- इयत्ता 1ली ते 7वी च्या मुलांचे क्रांती घोषणांचे आयोजन केले.
      4) मुख्याध्यापकांचे मुलांना क्रांतिकारकबद्दल व क्रांतिदिनाबद्दल भाषण.










Tuesday 8 August 2017

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ सातारा

महाराष्ट्र राज्य खाजगी  शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष  श्री  अजित  साळुंखे  राज्य उपाध्यक्ष श्री सुनील बुधावले  सर , सह सचिव  श्री संदीप मस्के सर आणि  सर्व  मुख्याध्यापक  यांनी  काल घेतलेला  कार्यक्रम  खूप  कष्टाने  उत्साहाने  घेऊन   घेतला आणि  छान आदर्श उपक्रम  कौतुकास्पद  केला आहे  सर्वाचे  मनापासून धन्यवाद

 💐💐💐💐🌹🌹🌹💐💐💐💐


आदर्श शिक्षक पुरस्कार
श्री नवनाथ चव्हाण सर, अभिजित डांगे सर, श्री धादमे सर व सौ कोकरे मावशी यांचा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन


बापूसाहेब चिपळूणकर मराठी शाळेतील देशमुख कॉलोनीतील *श्री नवनाथ चव्हाण* यांना व  मंगळवारपेठेतील उत्साही शिक्षक *श्री अभिजित अंकुशराव डांगे सर* यांना *महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर महासंघ सातारा जिल्हा* तर्फे *आदर्श शिक्षक* पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन

तसेच शाळेतील कर्मचारी मावशी सौ.कोकरे मावशी यांना *आदर्श कर्मचारी* पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा





Sunday 6 August 2017

मेरी पहेलियां

पहेलियाँ

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

आज इ.५ वी च्या मुलांना हिंदी भाषेत पहेलियाँ तयार करण्यास सांगितल्या.खूप वेगवेगळ्या आणि छान पहेलियाँ मुलांनी तयार केल्या.त्यातील काही पहेलियाँ खास आपणासाठी .मुलांची भाषा , भावविश्व , कल्पकता , रचना यात कोणताही बदल न करता आहे तसे शेअर करते.मुलांनी चांगला प्रयत्न केला आहे.बघा बरं  तुम्हाला आवडतात का?

📚📚📚📚📚📚📚📚📚📚

 *पहेलियाँ*


मै हूँ बडी
मंदिर  के सामने खडी
किसीसे ना लढी
ज्ञान देती खडी खडी
*BCMS.शाळा सातारा*


हमने देखा ऐसा बंदर
जो उछले पानी के अंदर
*मेंढक*

बिन बोले वह कह देती है
जाने कितनी बाते
*आँखे*

एक गुफा के दो रखवाले
दोन्हो लंबे दोन्हो ही काले
*मुंछे*

रोज सवेरे खाने जाते
मिलती है पर दिख न पाते
*हवा*


 मैं w w में खेलता हूँ
मैं सुपरमँन पंच देता हूँ
बताओ मैं कौन ?
*राँमन रेन्स*

मैं अंतरिक्ष मे रहता हूँ
सभी ग्रह मेरे सामने घुमते है
*सुरज*

मैरा आकार गोल है
मुझमे समाई जीवसृष्टी है
*पृथ्वी*

एक बोतल के दो रंग
बताओ मै कौन,
*अंडा*

मै पृथ्वी के पास रहता हूँ
मै सबका मामा हूँ
*चाँद*

नये जमाने का बच्चा हूँ
पर कान का कच्चा हूँ
जो भी तूम कहते इस पार
फैला देता हूँ उसपार
*टेलिफोन*

वायूमंडल मे रहता हूँ
पेड मुझे देते भरपूर
मै जीवन के लिए चाहिये जरुर
*आँक्सिजन*

तीन अक्षर का मेरा नाम
मै हूँ एक देश का नाम
अंत कटे तो वजन बन जाऊ
*भारत*

चलते चलते थक गई
आगे चला न जाए
लेकर चाकू गर्दन काटो
तब चलने लग जाए
*पेन्सिल*

होता काला नही बोलता
बच्चो को वह शिक्षा देता
न वह पंडीत न विद्वान
न अध्यापक पर देता ज्ञान
*फलक*

काशी की कली
बिठुर मे खिली
झाँशी मे पली
 लष्कर मे चमकी
*लक्ष्मीबाई*

मारने मे सोटा
खाने मे मिठा
बताओ मै कौन?
*गन्ना*

एक चीज ऐसे बतलाए
फल,फुल,मिठाई बन जाए
*गुलाब जामून*

उसका तन कोमल है
पिला रंग सुहाना
बच्चो मगर भुलकर उसकी
अंग्रेजी न बनाना
*केला*

हरे रंग का अनोखा आँटा
लेलो हाथ पर बनेगा लाल परोठा
*मेंहदी*

कहते उसको रात की रानी
आँख से हरदम टपके पानी
*मोमबत्ती*


 मै कटू या मरु
तुमको क्यों आसू
*प्याज*


मै हूँ कब्बडी प्लेअर
मै बिजली की तरह निकल जाता हूँ
मै हूँ भारत का कँप्टन
*प्रदीप नरवाल*

खेल मेरा क्रिकेट
मै हूँ बाँलर
रहता वेस्ट इंडिज मे
*ब्राओ*

मै खेलता w w
मेरे पास है चँम्पीअनशिप
बताओ मै कौन?
*ए.जे.स्टाईल*

खेल मेरा क्रिकेट
मै खेलता हू IPL
मै राँयल चँलेन्ज बँगलोर का हूँ कप्तान
बताओ मै कौन?
*विराट कोहली*


मै खेलता हूँ w w
मेरे पास है मनी बँक
*सेतराँलेंस*

मै हुँ चौकोन
मेरा रंग काला
मुझपर लिखा जाता है ज्ञान
*फलक*

कटोरे पे कटोरा
बेटा बाप से भी गोरा
*नारियल*

सभी लोग चले गए
बुढ्ढा आटक गया
*ताला*

ए बहन तू उतर मै चढती हूँ
*रोटी*

लाल छडी
जमिन मे गडी
और उसी में बडी
*बिट*

पृथ्वी पर मे रहता हूँ
मै हरा हूँ
सबको सुख छाँव देता हूँ
*पेड*


मै भारत की शान
सभी भारतीय रखते है मेरा मान
मेरे है तीन रंग
*तिरंगा*

मै हूँ पहली महिला शिक्षिका
मैने दी है बेटीयोंको शिक्षा
बताओ मै कौन?
*सावित्रीबाई फुले*


 मै हूँ पुरा काला
हरदम तुम्हारे साथ रहता
कभी न छोडता साथ
*परछाई*

मै हूँ गुजरात का वासी
भारत का विकास यही है मेरी खासी
कालेधन के विरोध मे
बंद किए ५००  १००० के नोट
*नरेंद्र मोदी*

Saturday 5 August 2017

शब्द रूपे वाचा व लिहा

मराठी शब्द संपत्ती

*शब्द रूपे वाचा व लिहा*

*(१)वाचणे -  वाचले -  वाचलेले*

*(२)रडणे   -  रडली -   रडलेली*

*(३)मारणे  -   मारले -   मारलेले*

*(४)राहणे   -  राहिले -   राहिलेली*

*(५)थांबणे  -  थांबला -   थांबलेला*

*(६)चालणे  - चालला-    चाललेला*

*(७)संपणे   -  संपला-     संपलेला*

*(८)मोडणे  -  मोडले -    मोडलेले*

*(९) फोडणे  -  फोडले-    फोडलेले*

*(१०)दिसणे  - दिसला -   दिसलेला*

*(११) चावणे -  चावला -   चावलेला*

*(११)बांधणे  - बांधले -    बांधलेले*

*(१२)निवडणे -निवडली-  निवडलेली*

*(१३)कापणे - कापले - कापलेले*

*(१४)चालवणे - चालवली- चालवलेली*

*(१५)घडणे - घडला - घडलेला*

*(१६)लपवणे -लपवले - लपवलेले*

*(१७)सोडणे - सोडले -    सोडलेले*

*(१८)ठेवणे - ठेवल्या - ठेवलेल्या*

*(१९)पोचणे - पोचलो -पोचलेलो*

*(२०)उगवणे -उगवला- उगवलेला*

*(२१) पसरणे - पसरली - पसरलेली*

*(२२)पसरवणे- पसरवली- पसरवरलेली*

*(२३)झाडणे  - झाडली -      झाडलेली*

*(२४)पोहणे - पोहला -      पोहलेला*

*(२५)शिकवणे-शिकवल- शिकवलेले*

*(२६)फाडणे - फाडला -    फाडलेला*

*(२७)विणणे - विणले -      विणलेले*

*(२८)जिंकणे - जिंकलो -    जिंकलेला*

*(२९)नाचणे  - नाचले  -     नाचलेले*

*(३०)खेळणे - खेळले -     खेळलेला*

*(३१)फसवणे -फसवले- फसवलेला*

*(३२)देणे   -   दिले  -  दिलेले*

*(३३)ऐकणे - ऐकले - ऐकलेली*

*(३४)करणे -  केले  -  केलेले*

*(३५)पिणे - प्यायले - प्यायलेले*

*(३६)वागणे  - वागले - वागलेले*

*(३७)बसणे - बसले -  बसलेले*

*(३८)लिहिणे -लिहिले -लिहिलेले*

*(३९)पाहणे - पाहिले - पाहिलेले*

*(४०)आणणे - आणली -आणलेली*

*(४१)दळणे -  दळले -  दळलेले*

*(४२)म्हणणे  - म्हटले-   म्हटलेले*

*(४३)बोलणे  - बोलले - बोललेले*

*(४४)सांगणे - सांगितली- सांगितलेली*

*(४५)विचारणे-विचारले -   विचारलेली*

*(४६)जोडणे - जोडले-       जोडलेले*

*(४७)धुणे  - धुतले -         धुतलेले*

*(४८)भेटणे -भेटला - भेटलेला*

*(४९)फेकणे - फेकले -  फेकलेले*

*(५०)पोचणे - पोचलो - पोचलेले*

English garden of words

इंग्रजी शब्द भांडार
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

*📚📚OPPOSITE  WORDS📚📚*

🌅A🌅

absent × present
accept × decline, refuse
accurate × inaccurate
admit × deny
advantage × disadvantage
agree × disagree
alive × dead
all × none, nothing
always × never
ancient × modern
answer × question
apart × together
appear × disappear, vanish
approve × disapprove
arrive × depart
artificial × natural
ascend × descend
attractive × repulsive
awake × asleep

🌅B🌅

backward × forward
bad × good
beautiful × ugly
before × after
begin × end
below × above
bent × straight
best × worst
better × worse, worst
big × little, small
black × white
blame × praise
bless × curse
bitter × sweet
borrow × lend
bottom × top
boy × girl
brave × cowardly
build × destroy
bold × meek, timid
bound × free
bright × dim, dull
brighten × fade
broad × narrow

🌅C🌅

calm × windy, troubled
capable × incapable
careful × careless
cheap × expensive
cheerful × sad, discouraged, dreary
clear × cloudy, opaque
clever × stupid
clockwise × counterclockwise
close × far, distant
closed × open
cold × hot
combine × separate
come × go
comfort × discomfort
common × rare
contract × expand
cool × warm
correct × incorrect, wrong
courage × cowardice
create × destroy
crooked × straight
cruel × kind
compulsory × voluntary
courteous × discourteous, rude

🌅D🌅

dangerous × safe
dark × light
day × night
dead × alive
decline × accept, increase
decrease × increase
deep × shallow
definite × indefinite
demand × supply
despair × hope
disappear × appear
diseased × healthy
down × up
downwards × upwards
dry × moist, wet
dull × bright, shiny

🌅E🌅

early × late
east × west
easy × hard, difficult
empty × full
encourage × discourage
end × begin, start
enter × exit
even × odd
export × import
external × internal

🌅F🌅

fade × brighten
fail × succeed
false × true
famous × unknown
far × near
fast × slow
fat × thin
few × many
find × lose
first × last
foolish × wise
fold × unfold
forget × remember
found × lost
friend × enemy

🌅G🌅

generous × stingy
gentle × rough
get × give
girl × boy
glad × sad, sorry
gloomy × cheerful
good × bad
great × tiny, small, unimportant
guest × host
guilty × innocent

🌅H🌅

happy × sad
hard × easy
hard × soft
harmful × harmless
hate × love
healthy × diseased, ill, sick
heaven × hell
heavy × light
here × there
high × low
hill × valley
horizontal × vertical
hot × cold
humble × proud

🌅I🌅

in × out
include × exclude
inhale × exhale
inner × outer
inside × outside
intelligent × stupid, unintelligent
interior × exterior

🌅J🌅

join × separate
junior × senior

🌅K🌅

knowledge × ignorance
known × unknown

🌅L🌅

landlord × tenant
large × small
last × first
laugh × cry
lawful × illegal
leader × follower
left × right
less × more
like × dislike, hate
limited - boundless
little × big
long × short
loose × tight
loss × win
loud × quiet
low × high

🌅M🌅

major × minor
many × few
mature × immature
maximum × minimum
melt × freeze

🌅N🌅

narrow × wide
near × far, distant
never × always
new × old
no × yes
noisy × quiet
none × some
north × south

🌅O🌅

odd × even
offer × refuse
old × young
on × off
open × closed, shut
opposite × same, similar
out × in
over × under

🌅P🌅

past × present
peace × war
permanent × temporary
plural × singular
polite × rude, impolite
possible × impossible
powerful × weak
pretty × ugly
private × public
pure × impure, contaminated
push × pull

🌅Q🌅

qualified × unqualified
quiet × loud, noisy

🌅R🌅

raise × lower
rapid × slow
rare × common
regular × irregular
real × fake
rich × poor
right × left, wrong
rough × smooth

🌅S🌅

safe × unsafe
secure × insecure
scatter × collect
separate × join, together
shallow × deep
shrink × grow
sick × healthy, ill
simple × complex, hard
singular × plural
sink × float
slim × fat, thick
sorrow × joy
start - finish
strong × weak
success × failure
sunny × cloudy

Wednesday 2 August 2017

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतीसिंह नाना पाटील जयंती कार्यक्रम



क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत. सांगली जिल्ह्यातील येङमच्छिंद्र हे त्यांचे मूळ गाव.

नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. नाना पाटील यांना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.

ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.

नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.

या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.

नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.

१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.

यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.