महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 4 November 2017

वाघ : राष्ट्रीय प्राणी

वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्हआहे[३]. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.
वाघ
बांधवगड राष्ट्रीय उद्यानातील वाघ
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश:कणाधारी
जात:सस्तन
वर्ग:मांसभक्षक
कुळ:मार्जार कुळ(फेलिडे)
जातकुळी:पँथेरा
जीव:P. tigris
शास्त्रीय नाव
पँथेरा टायग्रीस
(Linnaeus1758)
वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश(हलक्या पिवळ्या रंगात) २००६ मधील (हिरव्या रंगात).[२]
वाघाचा भूतपुर्व आढळप्रदेश(हलक्या पिवळ्या रंगात) २००६ मधील(हिरव्या रंगात).[२]
इतर नावे
Felis tigris Linnaeus1758
वाघ striatus Severtzov1858
वाघ regalis Gray1867

आढळ व वसतीस्थानसंपादन करा

वाघाचे खरे माहेरघर हे भारत मानले जाते. आजही तेथे काही शेकड्यांनी वाघ शिल्लक आहेत. तिथून वाघ मंचुरियाचीनआग्नेय अशियातून भारतात आला असे मानले जाते[संदर्भ हवा ]. यातील बऱ्याच भागात पूर्वी वाघ मुबलक प्रमाणात आढळत होता परंतु शिकार व वसतीस्थानाचा नाश यांमुळे तेथून वाघ नामशेष झाला. आज प्रामुख्याने जंगली वाघ हा भारतब्रह्मदेशथायलंडचीन व रशिया या देशात आढळतो तसेच प्राणिसंग्रहालयातील वाघ आज जगभर सर्वत्र पोहोचले आहेत व वाघांच्या एकूण संख्येचा मोठा भाग आहे. जंगली वाघातील ५० टक्क्यांपेक्षाही अधिक वाघ आज फक्त भारतात उरले आहेत.
वाघांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी भारतात देखील वाघ आज दुर्मिळ झ़ाला असून त्यांची संख्या चिंताजनक आहे. भारतातील पंजाबहरियाणा ही राज्ये सोडल्यास सर्व राज्यात वाघाचे थोडे थोडे अस्तित्व आहे.
भारतातील वाघांच्या आढळाचे ५ उपविभाग आहेत --
  1. हिमालय व तराई विभाग - यात जम्मू आणि काश्मीर,हिमाचल प्रदेशउत्तरांचलउत्तरप्रदेशबिहारसिक्कीम,आसाम अरुणाचल प्रदेश व इशान्य भारतातील राज्ये येतात. यातील हिमालयाच्या तराई जंगलांमध्ये वाघांचे वसतीस्थान आहे.
  2. अरावली पर्वताच्या पूर्व भागातील शुष्क जंगलांमध्ये वाघांचे अस्तित्व आहे यात रणथंभोर सरिस्का सारखी राष्ट्रीय उद्याने येतात.
  3. सुंदरबन व ओडिशा .
  4. मध्य भारतातील पानगळी जंगलांमध्ये वाघांचे सर्वाधिक अस्तित्व येथे आढळते. यात कान्हाबांधवगड,मेळघाट(गुगमाळ्), ताडोबा यासारखी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये येतात.
  5. सह्याद्री व मलबार किनारा यात प्रामुख्याने सह्याद्रीचा दक्षिण भाग येतो. बंदीपूरमदुमलाई पेरियार इत्यादी. महाराष्ट्रातील सह्याद्रीत केवळ कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांचे अस्तित्व आहे.[४]
वाघाचे वसती स्थान हे मुख्यत्वे दाट ते अतिशय घनदाट जंगलात आहे. वाघाच्या शिकार पद्धतीमुळे त्याने त्याचे वसतीस्थान निवडले असावे. राजस्थानातील शुष्क जंगले, तसेच सुंदरबन मधील खारफ़ुटीची जंगले, काझ़ीरंगातील गवताळ जंगल असे विविध प्रकारच्या जंगलात वाघाचे वास्तव्य आहे. तरीदेखील वाघ हा बिबट्यासारखा कोणत्याही प्रकारच्या जंगलात राहण्यास सरावला नाही. तसेच प्रत्येक वाघांचे शिकारीचे क्षेत्र हे बरेच मोठे असते (साधारणपणे १०० चौ.किमी). त्यामुळे वाघ साधारणपणे मोठी जंगले पसंत करतात. म्हणूनच पूर्वीच्या मध्यम आकाराच्या जंगलात वाघ दिसत व आज ती जंगले हे लहान झाल्यामुळे वाघांचे अस्तित्व संपृष्टात आलेसंदर्भ हवा ]. (उदा: महाराष्ट्रातील सह्याद्री व कोकणातील जंगले)

वर्णनसंपादन करा

वाघ हा वर नमूद केल्याप्रमाणे मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. वाघाचा आकार हा स्थानिक परिस्थितीप्रमाणे कमी जास्त असतो. सायबेरीयन वाघ हा आकाराने मोठा असतो तर भारतीय वाघ त्या मानाने कमी भरतो. सायबेरीयन वाघ हा लांबीला ३.५ मीटर पर्यंत भरतो तर त्याचे वजन ३०० किलोपर्यंत असते. हा अपवाद झाला परंतु १९० -२०० सेमी पर्यंत लांब असतात व त्यांचे सरासरी वजन २२७ किलो पर्यंत असते. भारतीय वाघ साधारणपणे वजनात १०० ते १८० किलोपर्यंत भरतो. मादी ही नरापेक्षा लहान असते.सुमात्रा मधील वाघ हा अजूनच लहान असतो. वाघांची ओळखण्याची सर्वात मोठी खूण् त्यांचे अंगावरचे पट्टे व तांबूस रंगाची फ़र असते. प्रत्येक वाघाचे अंगावरील पट्टे हे वेगळे असतात. जसे प्रत्येक माणासाचे ठसे वेगळे असतात त्याच प्रमाणे. यावरून वाघांना ओळखता येते. परंतु जंगली वाघ दिसायला मिळणे ही दुर्मिळ घटना असते त्यामुळे ही पद्धत अजूनही ग्राह्य ज़लेली नाही. वाघाच्या अंगावर साधारणपणे १०० पर्यंत पट्टे असतात. पट्ट्यांचा मुख्य उपयोग वाघांना दाट झाडींमध्ये सद्रुश होण्यासाठी होतो. पट्ट्यांबरोबरच प्रत्येक वाघाचे पंज्याची ठेवणही वेगळी असते. वाघांची पारंपारिक गणना पंजाच्या ठश्यांवरूनच होते. वाघाचा पंजा हा वाघाच्या आकारमानाने खूप मोठा व अतिशय ताकदवान असतो. त्याचा व्यास साधारणपणे ६ ते ८ इंच इतका भरतो. जंगलातून फ़िरताना वाघ जरी दिसला नाही तरी वाघाचे ठसे दिसू शकतात.शिकार साधण्यासाठी वाघांचा जबडा जबरदस्त ताकदवान असतो व तो वर-खाली या दिशेत फिरतो. जबड्याची ताकद ते भक्ष्यामध्ये सुळे रुतवण्यासाठी तसेच भक्ष्याला पकडून ठेवणे, ओढून नेणे या कामासाठी वापरतात. वाघाची सर्वात जास्त ताकद त्याच्या जबड्यात असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वाघ हे पट्टीचे पोहोणारे आहेत, म्हणजे त्यांची पोहोण्याची क्षमता चांगलीच असते व या बाबतीत इतर मांजरांपेक्षा वेगळी सवय आहे. वाघांना पाणी आवडते. उन्हाळ्याच्या दिवसात वाघ पाण्यात तासन तास डुबुंन स्वता:ला थंड ठेवतात.

प्रजोत्पादनसंपादन करा

सैबेरियन वाघ व वाघीण
वाघाची मादी वर्षातून फारच थोडे दिवस माजावर असते व त्याकाळात नर वाघाशी सलगी करून प्रणयराधना करते. वाघांची प्रणयक्रिडा ही पहाणार्‍याला अतिशय हिंसक वाटू शकते. मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत वाघांचा समागम चालतो. नर वाघ समागम करताना मादीची मान आपल्या जबड्यात पकडतो. असे का? याचे उत्तर अजून सापडलेले नाही. काहींच्या मते समागम यशस्वी व्हावा व दरम्यान वाघिणीने कमी हालचाल करावी यासाठी असे वाघ करतो.[५]समागमानंतर काही काळातच नर व मादी विभक्त होतात. मादीला गर्भ धारणा झाल्यावर १६ आठवड्याच्या कालावधीनंतर ३-४ बछड्यांना जन्म देते. पिल्ले ही जन्मतः अतिशय नाजूक व अंध असतात. नर वाघाच्या तडाख्यात पिल्ले सापडल्यावर त्यांना ठार मारतो. म्हणून या काळात मादी अतिशय आक्रमक असते. पिल्ले अतिशय भराभर वाढतात. परंतु पिल्लांचा पूर्ण वाढण्याचा कालावधी १८ महिन्यांचा असतो. पिल्ले आई व भावंडांसोबत दोन ते अडिच वर्षे व्यतीत करतात. वाघाची पिल्ले लहानपणी अतिशय खेळकर असतात. पिल्ले जसजशी मोठी होतात तशी त्यांची आई त्यांना शिकार साधण्यात पारंगत करते. सुरुवातीस अर्धमेली शिकारीशी खेळण्यास शिकवते व नंतर जिवंत सावजांवर हल्ले करण्यास शिकवते. पुर्ण वाढीनंतर पिल्ले स्वतःहून नवीन क्षेत्र शोधण्यास जातात किंवा आई पिल्लांना सोडून निघून जाते. नर पिल्लांना इतर नरांशी क्षेत्र मिळवण्यास स्पर्धा करावी लागते. माद्यांना नवीन क्षेत्र मिळवण्यात फारसे श्रम पडत नाहीत. बहुतेक करून माद्यांना एखाद्या नराच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये जागा मिळून जाते. वाघांचे बंदीवासातही वीण चांगली होते.

क्षेत्रफळ स्वामित्वसंपादन करा

वाघ हा एकटा रहाणारा प्राणी असून तो आपले क्षेत्रफळ राखून ठेवतो. नर वाघाचे क्षेत्रफळ ६० ते १०० चौ.किमी असते. नर वाघ आपल्या क्षेत्रफळात अनेक वाघिणींना आपल्या क्षेत्रफळात सामावून घेतो. वाघिणीचे क्षेत्रफळ १५ ते २० चौ.किमी असते. वाघ बहुतांशी आपल्या क्षेत्रात दुसऱ्या वाघांना येण्यास मज्जाव करतात. तसे केल्यास होणारे भांडण हे जीवघेणे असू शकते. वाघ आपले क्षेत्र झाडांवर मुत्राचे फवारे मारून आखून घेतात. नर वाघ आपल्या पिल्लांचे देखील अतिक्रमण सहन करत नाही. परंतु काही वेळा नर वाघ पित्याची भूमिका देखील बजावल्याचे आढळले आहे. जॉर्ज शेल्लरने तसेच वाल्मिक थापर <[६]. यांनी अश्या नोंदी नोंदवल्या आहेत.

आहार व शिकारपद्धतसंपादन करा

वाघाची सर्वात जास्त ताकद जबड्यात असते. जबड्याचा उपयोग शिकार करणे, ओढून नेणे इत्यादी साठी होतो.
वाघ हा पुर्णत: मासांहारी प्राणी आहे तसेच वाघाचे शिकारी कौशल्य वादातीत आहे. पुर्ण वाढ झालेला हत्ती सोडला तर वाघ कोणत्याही जमीनीवरील प्राण्याची शिकार करण्यास समर्थ आहे. वाघाची मुख्य शिकार मध्यम ते मोठ्या आकाराचे प्राणी आहेत. सांबर हे वाघाचे सर्वात आवडते खाद्य आहे. तसेच इतर प्राणी उदा: रानगवाचितळभेकर व इतर हरणे, रानडुक्करनीलगायरानम्हैस इत्यादी आहेत. वाघाचे खाद्य प्रांतानुसार, उपलब्धतेनुसार तसेच वयानुसार बदलते. पुर्ण वाढलेल्या हत्तीची तसेच गेंड्याची वाघांशी सामना झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु साधारणपणे सामना टाळण्याचा कल असतो. वाघ बहुतांशी एकटे शिकार करतात. प्रजनन काळात जोडीने शिकार केल्याची उदाहरणे आहेत तसेच पिल्ले आपल्या वाढत्या काळात आईच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित पण शिकार करतात.
वाघांची शिकारीचे तंत्र हे बहुतांशी एकच असते. वाघ आपले सावज हेरतात व दबा धरून सावजाला न कळता जास्ती जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा सावज एक दोन ढांगेच्या अंतरावर येते तेव्हा चपळाईने सावजावर वाघ चाल करून जातो. पुर्ण वाढलेला वाघही साधारणपणे ६५ किमी/तास इतक्या वेगाने चाल करून जाऊ शकतो. तसेच वाघाची एक ढांग ५ते ६ मीटर पर्यंत जाऊ शकते. या वेगाने व आपल्या वजनाच्या संवेगाने वाघ सावजाला खाली पाडू शकतो. वाघ मोठ्या सावजांसाठी गळ्याचा चावा घेण्याचा प्रयत्न करतो व श्वसननलिका फ़ोडतो. सावज हलू नये यासाठी आपल्या नख्यांनी व ताकदवान पंज्यानी सावजाचा जीव जाई पर्यंत धरून ठेवतो. छोट्या प्राण्यांसाठी वाघ सरळ मानेचा लचका तोडतो यात सावज लगेचच मरुन जाते. एकदम छोट्या सावजांसाठी वाघाचा पंजाचा एक दणका सावजाची कवटी फ़ुटायला पुरेसा असतो.
रणथंभोरचा एक वाघ शिकार करतांना
भारतीय वाघ वानरांची शिकार करण्यासाठी अनोख्या युक्तीचा उपयोग करतात. ज्या झाडावर वानरे असतील तर त्या ठिकाणी जाऊन मोठ्याने डरकाळी फ़ोडतात. वानरांच्या कळपातील काही वानरे घाबरून अथवा ह्रुदय बंद पडून झाडाखाली पडतात[७]. वाघ पाण्यात पोहूनही आपले भक्ष्य मिळवू शकतात तसेच पाण्यातून आपले भक्ष्य ओढूनही घेउन जातात. रणथंभोरचा आजवरचा सर्वाधिक प्रसिद्ध`चंगीज´ नावाचा वाघ पाण्यातील सांबरांवर आक्रमण करण्यात पटाईत होता. याच्या शिकारीची क्षणचित्रे अनेक वाघांवरच्या चित्रपटात आहेत.वाघ शिकार साधल्यावर शिकार ही मुख्यत्वे लपवून ठेवतो. लपवून ठेवण्याचे मुख्य कारण म्हणजे शिकारीला अस्वलेतरस खासकरून गिधाडेइत्यादी प्राण्यांपासून दूर ठेवणे. लपवून ठेवण्यासाठी गुहा अथवा झाडांची दाट जाळी निवडतो. वाघ हा अतिउच्च दर्जाचा शिकारी असला तरी वाघाला एक शिकार मिळवायला सरासरी २० प्रयत्न करावे लागतात[८]. वाघाला एकदा शिकार केल्यावर भक्ष्याच्या आकारानुसार ती शिकार तीन ते सात दिवसापर्यंत पुरते. वाघ महिन्यातून सरासरी तीन ते चार वेळा शिकार साधतात. शिकार्‍यांनी केलेल्या नोंदीप्रमाणे वाघ शिकार खाण्याच्या बाबतीत अतिशय स्वच्छ प्राणी आहे. शिकार खाण्याच्या आगोदर वाघ पोट चिरूनआतडी पुर्णपणे बाहेर काढतो व लांबवर फेकतो त्यानंतरच शिकार खाण्यास सुरु करतो. भक्ष्यातील मांसल भाग खाण्यास वाघाची जास्त पसंती असते.सामापत.

उपप्रजातीसंपादन करा

वाघाच्या अनेक उपप्रजाती आहेत. या सर्वात स्थानिक परिस्थितीनुसार सर्वांच्यात बदल घडले आहेत. मुख्य फ़रक हा आकारमानात व थोड्याफ़ार सवयी व शिकारीची पद्धत इत्यादी आहे.

  • इंडोचायनीज वाघ इंडोचायनीज अथवा कोर्बेट्टी वाघ-(Panthera tigris corbetti)
    इंडोचायनीज अथवा कोर्बेट्टी वाघ
    ही वाघाची उपप्रजाती ईशान्य अशिया मध्ये दिसून येते. यात कंबोडिया, मलेशिया, ब्रम्हदेश, थायलंड, व्हिएतनाम, इत्यादी देशात आढळते. ही जात भारतीय वाघापेक्षा गडद रंगाची असून आकार लहान असतो व नराचे वजन १५० ते १९० किलो पर्यंत भरते. माद्यांचे वजन ११० ते १४० किलोपर्यंत असते. साधारणपणे एकून १००० ते १८०० वाघ वन्य अवस्थेत असल्याचा अंदाज आहे. यांचे सर्वात जास्त आढ्ळ मलेशिया मध्ये असून ते चोरट्या शिकारीवरील कडक नियंत्रणामुळेच शक्य झाले आहे. व्हिएतनाममध्ये या प्रजातीची मोठ्या प्रमाणावर चीनी औषधांसाठी शिकार झाल्याचे कळते.
  • मलेशियन वाघ-(Panthera tigris malayensis) हे फ़क्त मलेशियातील द्विपकल्पात दक्षिण भागात आढळून येतात. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार ही प्रजाती कोर्बेटी पेक्षा वेगळी असल्याचे सिद्ध झाले आहे. आजमितीला साधारणपणे ६०० ते ८०० वाघ असण्याची शक्यता आहे. हा वाघ मलेशियाचे राष्ट्रीय चिन्हावर विराजमान आहे.
  • सुमात्रन वाघ- (Panthera tigris sumatrae)
    सुमात्रन वाघ
    ), हा वाघ इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर आढ्ळून येतो व अतिशय चिंताजनक प्रजाती म्हणून याची गणना झाली आहे. हा वाघ आकाराने अतिशय लहान असतो. नराचे वजन १०० ते १३० किलो भरते तर मादीचे केवळ ७० ते ९० किलो. त्यांचा लहान आकार हा या बेटावरील अतिशय घनदाट जंगलात रहाण्यास सरावला आहे. जंगली सुमात्रन वाघांची संख्या आजमितीला ४०० ते ५०० असण्याची शक्यता आहे. सुमात्रामधील जंगलांचा -हास हे या वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण आहे.
  • सायबेरीयन वाघ - (Panthera tigris altaica)
    सायबेरीयन वाघ
    ही प्रजाती पुर्व रशियात आढळून येतेह्, याला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर् चीनी वाघ असेही म्हणतात. पुर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या पुर्व सायबेरीयातील प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमुर ला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरीयन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.
  • दक्षिण चीनी वाघ-(Panthera tigris amoyensis) ही वाघांमधील सर्वात चिंताजनक प्रजाती आहे व वन्य अवस्थेत जवळपास नामशेषच झालेली आहे. १९८३ ते २००७ मध्ये एकही चीनी वाघ दृष्टीस पडला नाही. २००७ मध्ये एका शेतकर्याने वाघ दिसल्याचे सांगितले[९]. माओंच्या चुकीच्या धोरणांमुळे तसेच चीनी औषधांसाठी ह्या वाघांची मोठ्या प्रमाणावर शिकार करण्यात आली. १९७७ मध्ये चीनी सरकारने या वाघाच्या शिकारीवर बंदी आणली पण तोवर खूप उशीर झाला होता. सध्या हे वाघ फ़क्त संग्रहालयात आहेत.
पांढरा वाघ - ही वाघाची कुठलीही वेगळी प्रजाती नसून हे केवळ वेगळ्या रंगाचे वाघ आहेत. जसे काही माणसांना कोड येतात व त्यांची त्वचा पांढरी पडते तसाच प्रकार या वाघांच्या बाबतीत होतो व असे होणे अनुवांशिक आहे तसेच वाघांचे पांढरे होणे हे देखील अनुवांशिक् आहे. आजचे सर्व पांढरे वाघ हे मध्यप्रदेशातील रेवा येथे सापडलेल्या पांढर्या वाघाचे वंशज आहेत[१०]. तसेच त्यानंतरचे सर्व पांढरे वाघ हे पुर्णत: प्राणी संग्रहालयातच जन्मलेले आहेत.
वाघाच्या नामशेष प्रजाती

No comments:

Post a Comment