महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Saturday 4 November 2017

मोर : भारताचा राष्ट्रीय पक्षी

मोर (शास्त्रीय नाव: Pavo cristatus, उच्चार: पावो क्रिस्टेटस) हा एक पक्षी आहे. मोरांमध्ये नराला पिसारा असतो; मादीला, म्हणजेच लांडोरीला, पिसारा नसतो. हाभारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

आकारसंपादन करा

मोर (नर) मोठ्या पक्ष्यांमधे गणला जातो. साधारणतः नर मोराची लांबी (चोचीपासून शेपूट सुरू होईपर्यंत) १०० ते ११५ सें.मी. असते. पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सें.मी. लांबीचा असू शकतो. मोराचे वजन ४ - ६ किलो असते. लांडोर (मादी) आकाराने लहान असतात. त्यांची लांबी साधारणतः ९५ सें.मी. आणि वजन २.७ - ४ किलो असते. लांडोरीला किचितही पिसारा नसतो.

खाद्यसंपादन करा

मोर धान्य, झाडाची पाने, किडेसापसरडे खातात. ते काही फळेही खातात.

वास्तव्यसंपादन करा

मोर पानझडी जंगलांत राहतात. ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात.

महाराष्ट्रात मोरांचे स्थानसंपादन करा

महाराष्ट्रात बऱ्याच गावांलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हे सरस्वती देवीचे वाहन आहे, या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना नेहमी खाद्य व पाणी देत असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली'[१] नावाच्या गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतरत्र शेतांतही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.

आवाजसंपादन करा

No comments:

Post a Comment