महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Friday 10 April 2020

जगातील देश : अमेरिकेची संयुक्त संस्थाने



आपला भूगोल : आपली पृथ्वी :

जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.

अमेरिकेची संयुक्त संस्थाने



उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.
अमेरिका
United States of America
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अमेरिकाचा ध्वजअमेरिकाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: E Pluribus Unum (पारंपरिक; अर्थ: विविधतेत एकता)
In God We Trust (अधिकृत, १९५६ पासून)
राष्ट्रगीत: स्टार स्पॅंगल्ड बॅनर
अमेरिकाचे स्थान
अमेरिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीवॉशिंग्टन डी.सी.
सर्वात मोठे शहरन्यूयॉर्क शहर
इतर प्रमुख भाषाइंग्लिश
सरकारसंघीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखडॉनल्ड ट्रम्प (राष्ट्राध्यक्ष)
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(ब्रिटनपासून)
जुलै ४,१७७६ (घोषित)
सप्टेंबर ३१७८३ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण९६,३१,४२० किमी (३वा क्रमांक)
 - पाणी (%)४.८७
लोकसंख्या
 - २०१० (अनुमान)३०,९५,६६,००० (३वा क्रमांक)
 - घनता३२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न४१,३९९ अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनअमेरिकन डॉलर (USD)
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी -५ ते -१०/ -४ ते -१०
आय.एस.ओ. ३१६६-१US
आंतरजाल प्रत्यय.us, .gov, .edu, .mil, .um
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+१

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडामेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.
अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.
अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

इतिहाससंपादन करा




सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या.
१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळे व युरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ 95 टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.
४ जुलैइ.स. १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.
अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चीनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून उदयास आला.
याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धिने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्न धान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वता:ची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्याप्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्या प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.
१८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा विरोध सशस्त्र मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणीती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजीत गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन यादवी युद्ध असे म्हणतात.अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवीत हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धात नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगीरी हळूहळू सर्व राज्यात संपवण्यात आली. युरोप प्रमाणेच अमेरिकेने औद्योगिकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.

प्रशासकीय संरचनासंपादन करा




अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन राज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वतंत्रेच्या वेळीस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात मूळ संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला गेला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला.
अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था "फेडरल" (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक पातळ्यांमध्ये विभाजित आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद,अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वतेने ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे.

राष्ट्राध्यक्षसंपादन करा

५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिका) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यात विभागित केलेली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (कॉंग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. कॉंग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.
प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.
राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालांहून अधिक वेळ राहू शकत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसंपादन करा




अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे.

कॉंग्रेससंपादन करा

अमेरिकन कॉंग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिका) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.
कॉंग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार कॉंग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युध्द घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.
दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' येथे आहे.

५० राज्येसंपादन करा




संयुक्त अमेरिका देश ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी अलास्का व हवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ वर्ग मैल, १७,१७,८५४ वर्ग किमी) तर र्‍होड आयलंड हे सर्वांत लहान (१,५४५ वर्ग मैल, ४,००२ वर्ग किमी) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.
Sex information american country सध्या अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोरे जाहिर केले व त्यानंतर आलेल्या मंदिने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे.
वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे[१]. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचा प्रचंड आकार कारणीभूत आहे. राज्यांचे आकार व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरे प्रचंड व हवामान थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हि अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जापानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रेविमानेयुद्धनौका, पाणबुड्या यांच्यात शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

वस्तीविभागणीसंपादन करा





२००० साली अमेरिकेतील राहणार्‍या लोकांची मूळ देशानुसार विभागणी
अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.[२] पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.[३] २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्यावृद्धीदर ०.८९% आहे.[४] जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.[५] २००७च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणार्‍यांत मेक्सिकोच्या नागरिकांचे बहुसंख्यत्व आहे. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.[६] जगातील प्रगत देशांतील अमेरिका एकमेव असा देश आहे ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे.

No comments:

Post a Comment