महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Wednesday 8 April 2020

जगातील देश - कॅनडा







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.


देश - कॅनडा 
कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे. दक्षिणेस, दोन देशांना विभागणारी जगातली सर्वात लांब आंतराष्ट्रीय सीमारेषा कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून हिची लांबी ८,८९१ किलोमीटर इतकी आहे. कॅनडाची राजधानी ओटावा (उच्चार: ऑटोवा) आहे. कॅनडातील प्रमुख शहरे टोरोंटो, व्हॅन्कुव्हर, मॉन्टरियाल आहेत.
कॅनडा
Canada
कॅनडा
कॅनडाचा ध्वजकॅनडाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: A Mari Usque Ad Mare (लॅटिन)
(समुद्रापासून समुद्रापर्यंत)
राष्ट्रगीत: ओ कॅनडा
कॅनडाचे स्थान
कॅनडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीओटावा
सर्वात मोठे शहरटोरॉंटो
अधिकृत भाषाइंग्रजीफ्रेंच
सरकार
 - राष्ट्रप्रमुखएलिझाबेथ दुसरी (राणी), मिकाएल ज्यॉं (गव्हर्नर जनरल)
 - पंतप्रधानजस्टिन ट्रुडो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(ब्रिटनपासून)
जुलै ११८६७ 
क्षेत्रफळ
 - एकूण९९,८४,६७० किमी (२वा क्रमांक)
 - पाणी (%)८.९२
लोकसंख्या
 -एकूण३,७६,०२,१०३ (३६वा क्रमांक)
 - घनता३.९२ चौ. किमी/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१.१०५ निखर्व अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न३४,२७३ अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनकॅनेडियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी -३.५ ते -८
-२.५ ते -७ (DST)
आय.एस.ओ. ३१६६-१CA
आंतरजाल प्रत्यय.ca
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+१
राष्ट्र_नकाशा

इतिहाससंपादन करा

नावाची व्युत्पत्तीसंपादन करा

कॅनडा हे नाव इराक्वॉस जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दापासून आलेले आहे.

प्रागैतिहासिक कालखंडसंपादन करा

भूगोलसंपादन करा

कॅनडा उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात पसरलेला विशाल देश आहे. याला फक्त अमेरिकेशी सीमा आहे व कॅनडाच्या इतर तीन बाजूंना समुद्र आहेत.

चतु:सीमासंपादन करा

कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर व अमेरिकेचे अलास्का राज्य आहेत.

राजकीय विभागसंपादन करा

कॅनडाचे १० प्रांत व तीन इतर राजकीय प्रदेश आहेत.

मोठी शहरेसंपादन करा

लोकसंख्येनुसार शहरांची यादी
शहरलोकसंख्या
टोरॉंटो
२६,१५,०६०
मॉंत्रियाल
१६,४९,५१९
कॅल्गारी
१०,९६,८३३
ओटावा
८,८३,३९१
एडमंटन
८,१२,२०१
मिसिसागा
७,१३,४४३
विनिपेग
६,६३,६१७
व्हॅंकूव्हर
६,०३,५०२
हॅमिल्टन
५,१९,९४९
क्वेबेक सिटी
५,१६,६२२

समाजव्यवस्थासंपादन करा

वस्तीविभागणीसंपादन करा

इ.स. २००६च्या अंदाजानुसार कॅनडाची लोकसंख्या ३,१६,१२,८९७ आहे. येथील लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे बाहेरदेशातून येणाऱ्या लोकांमुळे आहे. वस्तीवृद्धीचा दर वर्षास ५.४% आहे.
कॅनडातील तीन चतुर्थांश वस्ती कॅनडा व अमेरिकेच्या सीमेपासून १५० कि.मी. (९० मैल) अंतराच्या आत राहते.

धर्मसंपादन करा

धर्मनिरपेक्षता ही कॅनडातील जनतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार कॅनडातील लोकसंख्येत ६७.२% ख्रिश्चन, २३.९% निधर्मी, ३.२% मुस्लिम, १.५% हिंदू, १.४% शिख, १.१ बौद्ध, १% ज्यू व ०.६% इतरधर्मीय आहेत.

शिक्षणसंपादन करा

कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.[१] प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.

No comments:

Post a Comment