महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Monday 13 April 2020

जगातील देश : आर्जेन्टिना







आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे.

जगातील देश : आर्जेन्टिना 

(स्पॅनिश: Argentina; उच्चार: आर्हेन्तिना (द.अ.) किंवा आर्खेन्तिना (स्पे.)) हा दक्षिण अमेरिकेतील एक देश आहे. ४०.५ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २७,६६,८८९ एवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने आर्जेन्टिना दक्षिण अमेरिकेतील दुसरा तर जगातील आठवा मोठा देश आहे. या देशाचा धर्म ख्रिश्चन असून येथे स्पॅनिश  इटालियन भाषा बोलल्या जातात. फक्त दक्षिण अमेरिका खंडाचा विचार केल्यास हा देश आकाराने दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा देश बोलिव्हिया  केप हाॅर्नच्या मध्ये ३७०० किमी. लांब पसरलेला आहे. याची जास्तीत जास्त रूंदी १५०० किमी. आहे. अमेरिकेतील एका भव्य पर्वताचे '''अकंकागुआ''' नावाचे सर्वात उंच शिखर मात्र या देशात आहे. १८१६ मध्ये या देशाला स्वातंत्र्य मिळाले. जगातील डिएगो मॅराडोना, लायोनेल मेस्सी हे नाववंत फुटबॉलपटू याच देशातील आहे. आर्जेन्टिनात कोळसा, शिसे, तांबे, जस्त, सोने, चांदी, निकेल व गंधकाचे साठे आहेत. हवाबंद डब्यात मांस भरून निर्यात करने, हा आर्जेन्टिनाचा प्रमुख उद्योग आहे.

आर्जेन्टिना
República Argentina
आर्जेन्टिनाचे प्रजासत्ताक
आर्जेन्टिनाचा ध्वजआर्जेन्टिनाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: En Unión y Libertad (अर्थ: एकतेत आणि स्वातंत्र्यात)
राष्ट्रगीत: ओइद मोर्तालेस, एल ग्रितो साग्रादो (मर्त्य मानवांनो, हा पवित्र घोष ऐका)
आर्जेन्टिनाचे स्थान
आर्जेन्टिनाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बुएनोस आइरेस
अधिकृत भाषास्पॅनिश
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखक्रिस्तिना फर्नांदेझ दे कर्शनर
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस(स्पेनपासून)
जुलै ९१८१६ (घोषित)
१९२१ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण२७,९१,८१० किमी (८वा क्रमांक)
 - पाणी (%)१.१
लोकसंख्या
 - २००९४,०१,३४,४२५ (३१वा क्रमांक)
 - घनता१५/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण६३२.२२३ अब्ज[१] अमेरिकन डॉलर (२२वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१४,०८७ अमेरिकन डॉलर (५०वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  (२००७) ०.८६९[२] (उच्च) (४९ वा)
राष्ट्रीय चलनपेसो (ARS)
आंतरराष्ट्रीय कालविभागआर्जेन्टाइन प्रमाणवेळ (ART) (यूटीसी - ३:००)
आय.एस.ओ. ३१६६-१AR
आंतरजाल प्रत्यय.ar
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक५४
राष्ट्र_नकाशा

No comments:

Post a Comment