महत्वाची सुचना - या ब्लॉग वरिल माहिती सोबत ब्लॉगर सहमत असेल असे नाही.या ब्लॉगचा उद़देश्य इंटरनेटजालावर असणारी माहिती महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना महिती करणे.व त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणे, एवढाच आहे. आणि या ब्लॉ्गला जोडलेल्या लिंक मध्येे मुळात बदल अथवा हॅक झाल्यावस त्याला ब्लॉागर जबाबदार राहणार नाही.सुरज ननावरे

Friday 17 April 2020

जगातील देश : अफगाणिस्तान








आपला भूगोल : आपली पृथ्वी :
जगातील देश : सुरज ननावरे

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील. आजपासून मी तुम्हाला दररोज एका देेशाची माहिती देेत आहे

अफगाणिस्तान (अधिकृत नाव : पश्तू भाषेत - अफगाणिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक: افغانستان اسلامي جمهوریت, फारसी: جمهوری اسلامی افغانستان,) हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत. महाभारतामधील कौरवांचा मामा व गांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संप्पन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे. अफगाणिस्तानमधील सोव्हियेत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. २००१ सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. सध्या (२०२० साली) येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे.
अफगाणिस्तान
د افغانستان اسلامي جمهوریت (पश्तू)
جمهوری اسلامی افغانستان (दारी)
अफगाणिस्तानाचे इस्लामी प्रजासत्ताक
अफगाणिस्तानचा ध्वजअफगाणिस्तानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: अफगाण राष्ट्रीय गीत
अफगाणिस्तानचे स्थान
अफगाणिस्तानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
काबुल
अधिकृत भाषादारीपश्तू
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखअश्रफ घनी
 - पंतप्रधानअब्दुल्ला अब्दुल्ला
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवसऑगस्ट १९इ.स. १९१९ 
क्षेत्रफळ
 - एकूण६,४७,५०० किमी (४१वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण३,१८,८९,९२३ (२००७, अंदाज) (३७वा क्रमांक)
 - घनता४६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१९.८४ अब्ज अमेरिकन डॉलर (११४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न७२४ अमेरिकन डॉलर (१७२वा क्रमांक)
राष्ट्रीय चलनअफगाणिस्तानी अफगाणी
आंतरराष्ट्रीय कालविभागयूटीसी+०४:३०
आय.एस.ओ. ३१६६-१AF
आंतरजाल प्रत्यय.af
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९३
राष्ट्र_नकाशा
अफगाणिस्तानची लोकसंख्या तीन कोटी असून, क्षेत्रफळ ६४७,५०० चौरस किलोमीटर एवढे आहे. आकारमानाच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४१वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४२वा आहे. काबुल ही अफगाणिस्तानाची राजधानी व तेथील सर्वात मोठे शहर आहे.

अफगाणिस्तानच्या चतु:सीमासंपादन करा


अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तानउझबेगिस्तान व ताजिकिस्तान हे देश आहेत

No comments:

Post a Comment